Bigg Boss Marathi 6 Day 16 Updates : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सोळाव्या दिवशी प्रेक्षकांना नवीन ड्रामा पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी घरात ‘पॉवर Key’ची चोरी झाली होती. ही चोरी अनुश्री मानेने केली होती. आता घरात विशालचं बॉडीवॉश चोरलं गेलं होतं. मात्र, ही बॉडीवॉशची बॉटल विशालला कॅप्टन रूमजवळ सापडते. यानंतर तो सर्व सदस्यांसमोर येतो आणि म्हणतो, “काहीदिवसांपूर्वी माझं बॉडीवॉश हरवलं होतं…आज मला ते कॅप्टन रूमजवळ सापडलं. चोरी ही वृत्ती आहे…आता मला सांगा कोणाचं जेवण बंद केलं पाहिजे.”

यावर विशाल कोटियनला आयुष म्हणतो, “ही बॉटल किती तरी दिवस तिथेच आहे” आता या बॉडीवॉश चोरी प्रकरणावरून घराचा कॅप्टन आयुष संजीव आणि विशाल यांच्यात काय वाद होणार? अंतिम निर्णय काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मात्र, नेटकऱ्यांनी या प्रकरणी विशाल कोटियनला धारेवर धरलं आहे. “हा विशाल एक नंबरचा आगाऊ आहे याने स्वत:च ते बॉडीवॉश लपवलं असेल”, “चोर सीझन…बिग बॉस मराठी ६ चं नाव चोरीचा मामला ठेवा”, “या आठवड्यात विशाल बाहेर गेला पाहिजे”, “जेवण बंद करा आता या लोकांचं” अशा कमेंट्स या प्रोमोवर आल्या आहेत.

Live Updates

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी सोळावा दिवस

20:49 (IST) 27 Jan 2026

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात दिसणार भारताच्या एकतेचं सुंदर दृश्य...

https://www.instagram.com/p/DUAJLAdCHfO/?hl=en

09:08 (IST) 27 Jan 2026
Bigg Boss Marathi Day 16 : विशालचं बॉडीवॉश चोरण्यामागे नेमकं कोण असेल?

Bigg Boss Marathi Day 16 : बॉडीवॉश चोरी प्रकरणावरून घराचा कॅप्टन आयुष संजीव आणि विशाल यांच्यात काय वाद होणार?

https://www.instagram.com/p/DT_1M59CC5B/

Bigg Boss Marathi 6 : विशालचं बॉडीवॉश नेमकं कोणी चोरलं? आयुष-विशालमध्ये वाद होणार, कोण आहे घरातील चोर? जाणून घ्या...