Bigg Boss Marathi 6Day 36 : ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचा आजपासून सहावा आठवडा सुरू होणार आहे. वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर घरातून दोन स्पर्धकांचं एलिमिनेशन झालं. त्यामुळे आता घरात राखीला वगळून फक्त ११ स्पर्धक आहेत. रविवारी भाऊच्या धक्क्यावर दोन धक्कादायक एलिमिनेशन्स पाहायला मिळाले. आयुष संजीवची प्रकृती ठिक नसल्याने तो गेल्या दोन आठवड्यांपासून गेममध्ये सक्रिय नव्हता. त्यामुळे आयुष घराबाहेर जाऊ शकतो याचा अंदाज प्रत्येकाला होता. पण, सोशल मीडिया स्टार करण सोनावणेचं अनपेक्षित एव्हिक्शन झालं आहे.

करण सोनावणे आणि आयुष संजीव या दोघांनी बिग बॉसच्या घरातून रविवारी एक्झिट घेतली. सचिन कुमावत, प्राजक्ता यानंतर खूप भावुक झाले होते. आता आयुष-करणच्या एक्झिटनंतर घरात केवळ ११ सदस्य बाकी राहिले आहेत. राखी घरातील १२ वी सदस्य आहेत पण, तिची एन्ट्री झाल्यापासून ती केवळ काही दिवसांसाठीच घरात गेलीये अशा चर्चा होत्या. अशातच आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये राखीला बिग बॉसची टीम घराबाहेर काढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

सहाव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रुचिता आणि राखी या दोघींमध्ये मोठा वाद होता. सुरुवातीला रुचिता राखीच्या बेडवर नेऊन काहीतरी टाकते आणि त्यानंतर राखी प्रचंड संतापते आणि घरातील सगळा कचरा रुचिताच्या बेडवर टाकते…अशाप्रकारे बिग बॉसच्या घरात घाण करणं हे नियमबाह्य आहे. त्यामुळे आता तिला शिक्षा करण्यात येईल असं बिग बॉसने जाहीर केलं आहे.

राखीला कन्फेशन रूममध्ये बोलावलं जातं आणि तिथून तिला बाहेर काढण्यासाठी बिग बॉसची माणसं येतात…राखीने बाहेर जाण्यास नकार दिल्यावर तिला खेचून बाहेर काढलं जातंय असं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता खरंच राखी घराबाहेर जाणार? की खेळात वेगळाच ट्विस्ट येणार हे लवकरच स्पष्ट होईल.

Live Updates

Bigg Boss Marathi 6 Updates

09:20 (IST) 16 Feb 2026

Bigg Boss Marathi 6 - आयुष संजीवने घेतला आहे बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप...

https://www.instagram.com/p/DUyLqGMiHil/

Bigg Boss Marathi 6 Day 36 Updates: सहाव्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी घरात राखी सावंत आणि रुचिता जामदार यांच्यात मोठा वाद होणार आहे. रुचिता राखीच्या बेडवर आधी मुद्दाम जाऊन काहीतरी टाकते, यानंतर राखी प्रचंड संतापते. घरातील सगळा कचरा उचलून ती रुचिताच्या बेडवर टाकणार आहे. यामुळेच बिग बॉस तिला शिक्षा म्हणून घराबाहेर काढण्याची शक्यता आहे.