scorecardresearch

लवकरच ‘या’ नाटकात झळकणार सुशांत-अस्तादची जोडी

सुशांत आणि आस्ताद यांसोबत राजेश भोसले, परी तेलंग, मधुरा देशपांडे आदी प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

आस्ताद काळे -सुशांत शेलार
छोट्या पडद्यावरील वादग्रस्त ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाने कमी काळामध्ये प्रेक्षकांची मन जिंकली होती. बिग बॉसच्या घरातली भांडणं हा कायमच चर्चेचा विषय ठरला. या वादाबरोबरच अभिनेता सुशांत शेलार आणि आस्ताद काळे यांच्यातील मैत्रीचा प्रेक्षकांना प्रत्यय आला. त्यामुळे मैत्रीची ही जोडगोळी लवकरच प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी एकत्र येणार आहे.

रंगनील निर्मित ‘MR & MRS लांडगे’ या आगामी नव्या नाटकातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १३ ऑक्टोबर रोजी वाशीमधील विष्णुदास भावे सभागृहामध्ये या नाटकाचा शुभारंभ होणार आहे.

‘MR & MRS लांडगे’ या नाटकाच्या निमित्ताने आम्हाला पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळाली. या नाटकामध्ये वयाचं भान विसरायला लावणारी ही बेभान कॉमेडी पाहायला मिळणार असून यामुळे प्रेक्षकांचं नक्कीच मनोरंजन होईल’, असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, कल्पना विलास कोठारी निर्मित या नाटकामध्ये सुशांत आणि आस्ताद यांसोबत या नाटकात राजेश भोसले, परी तेलंग, मधुरा देशपांडे, रमा रानडे, अमर कुलकर्णी, अलका परब यांच्या भूमिका आहेत. या नाटकाचं लेखन सुरेश जयराम यांनी केलं असून दिग्दर्शनाची जबाबदारी विजय केंकरे यांनी उचलली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bigg boss marathi fame astad kale and sushant shelar