‘बिग बॉस मराठी’ हा छोट्या पडद्यावरच्या सर्वात लोकप्रिय शो पैकी एक आहे. करोना काळामुळे हा शो तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, त्यामुळे चाहते खूप उत्सुकतेने हा शो पहात आहेत. सध्या सोशल मीडियावर जय दुधाने आणि मीरा जगन्नाथचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

बिग बॉसच्या घरात एखादं टास्क पूर्ण करण्यासाठी, जिंकण्यासाठी प्रत्येक स्पर्धक जिवापाड मेहनत घेताना दिसतो. नुकत्याच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत जय आणि मीरा देखील असाच एक टास्क परफॉर्म करताना दिसत आहेत. या टास्कमध्ये मीरा जयच्या पाठीवर बसलेली दिसत आहे आणि जय तिला घेऊन संपूर्ण अंगण फिरताना दिसत आहे. पुढे जय त्याचे पाय दुःखात असल्याचे सांगताच मीरा आपल्याला काही फरक पडत नसल्याचे सांगताना दिसली आहे. इतकेच नव्हे तर शेवटी थकून जय रडत असल्याचे देखील या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.


बिग बॉस मराठीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. नेटकरी यावर कमेंट करत जयला सपोर्ट करताना दिसत आहेत.

आता यावेळी नेमकं घडलं? हे एपिसोड प्रदर्शित झाल्यावरच कळेल. यंदाचा सिझन अभिनेता विशाल निकम,अक्षय वाघमारे, उत्कर्ष शिंदे, जय दुधाने, संतोष चौधरी, विकास पाटील, अविष्कार दारव्हेकर, अभिनेत्री मीरा जगन्नाथ, मीनल शाह, तृप्ती देसाई, गायत्री दातार, स्नेहा वाघ, सोनाली पाटील, सुरेखा कुडची, शिवलीला पाटील यांच्यात रंगणार आहे. बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन तुम्ही दररोज रात्री 9.30 वाजता कलर्स मराठी वाहिनीवर पाहू शकतात. तसंच २४/७ हा शो तुम्ही वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.