Big Boss Marathi Promo: ‘काळजाची धडधड वाढवणारा तो’ अन् ‘ती परम सुंदरी’ आहे तरी कोण?

‘बिग बॉस मराठी ३’ मधील पहिल्या दोन सदस्यांची पहिली झलक.

big-boss
(Photo-Colors Marathi/ Instagram)

‘बिग बॉस मराठी’ च्या ३ सिझन साठी आता फकत २ दिवस उरले आहेत. मात्र अद्याप या सिझनमध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार हे कळाले नाही. अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. चाहते अनेक तर्क लावताना दिसत आहेत. अशात ‘बिग बॉस मराठी’ च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता आणखीन वाढवली आहे.

कलर्स मराठी वाहिनीने नुकतेच दोन प्रोमो त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. हे दोन्ही प्रोमो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. पहिला प्रमो पोस्ट करत त्यांनी कॅप्शन दिलं, “तमाम पोरींच्या काळजाची धडधड आता वाढणार… जेव्हा ‘त्याची’ एन्ट्री होणार…पाहा #BiggBossMarathi3 19 सप्टेंबर संध्या 7 वा. आणि दररोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि कधीही @voot वर.” हा प्रोमोत दिसणारा नट पहुन हा कोण असेल? याचे तर्क नेटकरी कमेंट सेक्शनमध्ये लावत आहेत. काही नेटकऱ्यांना ‘लगिरं झालं जी’ फेम अभिनेता अक्षय वाघमारे आहे असे वाटत आहे. तर काही ना अभिनेता नितीश चवाण असल्याचे वाटत आहे.

कलर्सने शेअर केलेल्या दुसऱ्या प्रोमोत एक अभिनेत्री दिसत आहे ती ‘मीमी’ या चित्रपटातील ‘परम सुंदरी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या प्रोमोला, “तिच्या अदा हटके… तिची चाल काळजाचा ठोका चुकवे… कोण असेल ती पाहा #BiggBossMarathi3 19 सप्टेंबर संध्या 7 वा. आणि दररोज रात्री 9.30 वा. #ColorsMarathi वर आणि कधीही @voot वर.” असे कॅप्शन दिलं आहे.

‘बिग बॉस मराठी ३’ चा हा प्रोमो पहुन, काही चाहत्यांना यात दिसणारी मुलगी डान्सर फुलवा खांबकर, तर काही ना अभिनेत्री नेहा खान वाटत आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदा कोण असणार हे कोडे तर १९ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजताच कळणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षक आतुरतेने शो सुरू होण्याची वाट बघत आहेत. या सिझनचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेता महेश मांजरेकर करताना दिसतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss marathi new promo teases netizens on social media about contestants aad

ताज्या बातम्या