Video: “उपाशी ठेवणार आहात का?”, पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात जोरदार भांडण

मिरा जगन्नाथ आणि स्नेहा वाघ यांच्यामध्ये जोरदार भांडण झाल्याचे पाहायला मिळते.

bigg boss Marathi, bigg boss Marathi 3, meera jaganathan, sneha wagh,

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ ओळखला जातो. जवळपास दोन वर्षांनतर बिग बॉस मराठी सिझन ३ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रविवारी बिग बॉसच्या घरात स्पर्धकांची एण्ट्री झाली. सर्व स्पर्धक उत्साहात एकत्र दिसत होते. दरम्यान पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात जोरदार भांडण झाल्याचे पाहायला मिळते.

बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी जेवण काय बनवायचे यावर चर्चा सुरु होती. तेव्हा मिरा जगन्नाथ आणि स्नेहा वाघ या दोघींमध्ये जेवणावरुन वाद झाल्याचे दिसून आले. ‘मला सकाळचा नाश्ता कमी पडला, जेवण कमी झाले, प्रत्येक गोष्ट कमी पडते’ असे मिरा म्हणाली. त्यावर उत्तर देत स्नेहाने तुम्हाला पोटभर जेवण भेटेल असे म्हटले. मिराने त्यावर लगेच उत्तर दिले. ‘प्रश्न माझा नाहीये. तुम्ही असं नाही म्हणू शकत की तुम्ही करता का? हे चुकीचं आहे. मला काही ऐकायचं नाहीये’ असे मिरा म्हणाली.

नंतर पुढे स्नेहा ‘आम्ही करतोय ना जेवण’ असे मिराला म्हणाली. त्यावरच ‘म तुम्ही उपाशी ठेवणार आहात का? चांगलं सांगितलेलं यांना ऐकायचं नसतं’ असे मिरा बोलताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात पहिल्याच दिवशी स्पर्धकांमध्ये जोरदार भांडण झाल्याचे पाहायला मिळते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss marathi season 3 contestnat fight avb

ताज्या बातम्या