‘बिग बॉस मराठी’ सिझन ३ मध्ये विकेण्डचा डाव नाही?

‘बिग बॉस मराठी’ सिझन ३ साठी प्रेक्षकांची उत्सुकता अजून वाढणार.

bigg-boss
(Photo-Voot)

‘बिग बॉस मराठी’ सिझन 3 सुरू व्हायला आता काहीच दिवस उरले आहेत. बिग बॉसच्या घरात काय वेगळं पाहायला मिळणार? , कोणते स्पर्धक बिग बॉसच्या घरात दिसणार? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उद्भवत असतीलच. बिग बॉस मराठीमध्ये यंदा एंटरटेनमेंट अनलॉक होणार आहे एवढं नक्की. बिग बॉसच्या निर्मात्यांनी अद्याप घरात कोणते कलाकार दिसणार हे सांगितले नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढत चाली आहे. बिग बॉसच्या घरात खूप गोष्टी बदलणार आहेत.

बिग बॉसच्या घरात आठवडाभर जे काही घडतं, स्पर्धक जो काही गोंधळ घालतात त्याचा क्लास शनिवार-रविवारी घेतला जातो. हा क्लास सुप्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेता महेश मांजरेकर घेतात. स्पर्धकांचे रुसवे-फुगवे, कधी त्यांच्या खेळासाठी कौतुक करतात. वेळोवेळी महेश सरांचा धम्मक लाडू देखील बघायला मिळतो. या खास भागांना ‘विकेण्डचा डाव’,असे नावं दिले गेले होते. मात्र यंदाच्या सिझनमध्ये विकेण्डचा डाव नाही तर बिग ‘बॉसची चावडी’ असे नाव देण्यात आले आहे.

‘बिग बॉसच्या चावडी’वर घरातील प्रश्न सोडवले जाणार आणि वेळोवेळी चुका करणाऱ्या स्पर्धकांना शिक्षा ही सुनावली जाईल. बिग बॉस मराठी मध्ये या व्यतिरिक्त तुम्हाला मराठमोळी थीम ही दाखवली जाईल. तसंच घरातील सदस्य २४ तास प्रेक्षकांच्या नजरे समोर राहतील. हे ‘बिग बॉस मराठी’ एक्स्ट्रा तुम्ही वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकाल. बिग बॉस मराठी चा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित खेळ येत्या १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आणि नंतर दररोज रात्री ९.३० वाजता कलर्स चॅनलवर प्रदर्शित होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss marathi season 3 no more weekend ka war aad