scorecardresearch

‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व २१ दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला, प्रक्षेपणाची तारीख ठरली

हा प्रोमो शेअर करताना त्यांनी बिग बॉस कधीपासून सुरु होणार? याची तारीख जाहीर केली आहे.

‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व २१ दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला, प्रक्षेपणाची तारीख ठरली
बिग बॉस मराठीचे चाहते चौथ्या पर्वाची आतुरतेने वाट बघत आहेत.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ या कार्यक्रमाकडे पाहिलं जातं. ‘बिग बॉस मराठी’ हा शो लोकप्रिय शोपैकी एक आहे. ‘बिग बॉस मराठी’चे तीनही पर्व चांगलेच लोकप्रिय ठरले होते. बिग बॉसच्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. बिग बॉसचे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर आता लवकरच चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता त्याच्या प्रक्षेपणाची तारीख समोर आली होती.

कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा आणखी एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. कलर्स मराठीने शेअर केलेला हा प्रोमो अगदीच हटके पद्धतीचा आहे. या पर्वात महेश मांजरेकर अगदी हटके भूमिकेत दिसत आहे. यात ते विविध भूमिका साकारताना दिसत आहे. यात महेश मांजरेकर कधी पोस्टमन, कधी अम्पायर, तर कधी शाळेतला कडक मास्तर अशा भूमिकेत दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना त्यांनी बिग बॉस कधीपासून सुरु होणार? याची तारीख जाहीर केली आहे.

आणखी वाचा : Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस’च्या घरात दिसणार ‘हे’ कलाकार ? संभाव्य नावाची यादी समोर

100 दिवसांचा हा खेळ, कधी पास, कधी फेल. पण महेश सरांच्या मते, यंदा ‘All is well’ पाहायला विसरू नका “BIGG BOSS मराठी” Grand Premiere 2 ऑक्टोबरला संध्या 7 वा, सोम – शुक्र रात्री 10 वा, शनि- रवि रात्री 9:30 वा फक्त कलर्स मराठीवर!, असे कॅप्शन कलर्सने या प्रोमोला दिले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

आणखी वाचा : “मी आणि अक्षया…”, ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी होण्याबद्दल हार्दिक जोशीचे स्पष्टीकरण

येत्या २ ऑक्टोबरपासून बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरु होणार आहे. आता या बिग बॉस मराठीमध्ये कोण कोण कलाकार असणार, पुन्हा तोच राडा होणार का? मैत्री आणि प्रेमाचे वारे वाहणार का? याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच बिग बॉस मराठीमुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होणार असल्याचे दिसत आहे. तसेच यात सहभागी होणारे स्पर्धक कोण असणार याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या