अंतर्वस्त्रांवरुन बिग बॉस ओटीटीच्या स्पर्धकांमध्ये झाला वाद, गौहर खान म्हणाली…

स्पर्धक नेहा आणि दिव्यामध्ये वाद झाला आहे.

neha bhasin divya agarwal fight, neha bhasin, gauahar khan, Divya Neha Bhasin Fight Over Unwashed Underwear, divya agarwal, bigg boss ott latest update,
गौहरचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे.
बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरचा ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो सध्या चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धक दिव्या अग्रवाल, शमिता शेट्टी, राकेश बापट, नेहा भसीन हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहेत. एकीकडे बिग बॉसने घरातील सर्व कनेक्शन तोडले आहेत तर दुसरीकडे स्पर्धक आता एकटे त्यांचा खेळ खेळताना दिसत आहेत. दरम्यान दिव्या आणि नेहा यांच्यामध्ये अंतर्वस्त्रावरुन वाद झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्यामधील वाद पाहून गौहर खानने प्रतिक्रिया देत दिव्याला सुनावले आहे.

बिग बॉस ओटीटीच्या घरात दिव्या आणि शमिता बाथरुम एरियामध्ये उभ्या होत्या. तेथील वॉश बेसिन जवळ अंतर्वस्त्र असल्याचे त्यांनी पाहिले. ते पाहून शमिता आणि दिव्या ते कोणाचे आहे असे विचारु लागल्या. शमिता मूस जट्टानाला बोलावते आणि तिचे अंतर्वस्त्र आहेत का? असा प्रश्न विचारते. मुस्कान ते अक्षरा सिंहचे किंवा नेहा भसीनचे असल्याचे सांगते. तितक्यात नेहा तेथे येते आणि चुकून तेथे राहिले असल्याचे सांगते. नंतर ती माफी देखील मागते. पण दिव्या तिला ‘घटिया’ असे बोलते. ते ऐकून नेहा देखील संतापते आणि म्हणते, ‘प्रत्येक गोष्टीवर मला तुझा न मागितलेला सल्ला नको आहे. तू फार जास्त बोलते. मी यासाठी माफी देखील मागितली आहे तरी तू यावर चर्चा करत आहेस? ही इतकी मोठी गोष्ट नाही’ असे म्हणते.

आणखी वाचा :“बिग बॉस ओटीटीच्या घरात तर सेक्सही…”; स्पर्धकानेच केला होता गौप्यस्फोट

गौहरने बिग बॉस ओटीटीमध्ये हे सर्व पाहून ट्विटरद्वारे तिचे मत मांडले आहे. “पहिल्यांदा आपले अंतर्वस्त्र बाहेर विसरण्याची चूक होऊ शकते. पण स्वत: एक मुलगी असून दुसऱ्या मुलीला सर्वांसमोर लाजिरवाण्या पद्धतीने कसे वागवू शकते? याला ‘घटिया’ असे सर्वांसमोर बोलून त्या मुलीला तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागवताय. हे फार दु:खद आहे” या आशयाचे ट्वीट गौहरने केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bigg boss ott divya agarwal neha bhasin fight over underwear gauhar khan reacts avb