‘बिग बॉस ओटीटी’ स्पर्धक, अभिनेता राकेश बापट बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यापासून सतत चर्चेत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्यामधील जवळीक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ते सतत बिग बॉसच्या घरात एकत्र वेळ घालवताना दिसायचे. त्यामुळे ही जोडी सर्वानाच आवडली आहे. दरम्यान आता राकेशची पहिली पत्नी अभिनेत्री रिद्धी डोगरने राकेश आणि शमितामध्ये असलेल्या नात्याबद्दल तिच्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत.

राकेश आणि शमिताचे फॅन्सना त्यांची ही जोडी प्रचंड प्रमाणात आवडत आहे. त्यांनी या जोडीला ‘शारा’ असे नाव दिले आहे. बिग बॉसच्या घरातून सुरू झालेल्या त्यांच्या या नात्याबद्दल बोलताना राकेशची पूर्वाश्रमीची पत्नी रिद्धीने एका मुलाखतीत सांगितले की, “जर का ते सत्य असेल तर ती राकेश आणि शमितासाठी खूप आनंदी आहे.” जेव्हा राकेशला शमिता आणि त्याच्यात असलेल्या नात्यावर रिद्धीची काय प्रतिक्रिया आहेत असा प्रश्न विचारण्यत आला होती,तेव्हा ‘हिंदुस्तान टाइम्स’ ला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले, “मी जर का कोणा सोबत खुश आहे, तर या गोष्टीचा रिद्धीला खूप आनंद होईल. तसंच ती जरी रिलेशनशिपमध्ये असेल तर मलाही खूप आनंद होईल. आम्ही दोघेही इतके मोठे झालो आहोत की स्वता:साठी निर्णय घेऊ शकतो आणि आम्ही जरी वेगळे झालो असलो तरी आम्ही खूप चांगले मित्र आहोत.”

‘बिग बॉस ओटीटी’ च्या घरातून बाहेर आल्यावर राकेशने रिद्धीला त्याच्या घरातील प्रवासाबद्दल विचारले होते. याविषयी बोलताना तो पुढे म्हणाला, “रिद्धीला माझा बिग बॉस ओटीटीच्या घरातील प्रवास खूप आवडला आहे, आणि मी खूप छान खेळो असे तिने सांगितले. राकेशने शमिता आणि त्याच्या नात्याबद्दल बोलताना सांगितलं की त्याला शमित विषयी अजून खूप गोष्टी जाणून घ्याच्या आहेत, बिग बॉसच्या घरात ओळखण वेगेळे असतं आणि खऱ्या आयूष्यात ओळेखणं वेगळे.”