‘घटस्फोटानंतर कोलमडून गेलो होतो’, राकेश बापटने शमिलाता सांगितले खासगी आयुष्याविषयी

राकेश आणि शमिता एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्या सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत.

raqesh-bapat, bigg-boss-ott, shamita-shetty,
राकेशने अभिनेत्री रिद्धी डोगराशी लग्न केले होते.

बॉलिवूड चित्रपट निर्माता, दिग्दर्शक करण जोहरचा ‘बिग बॉस ओटीटी’ हा शो सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी सहभागी झाली आहे. शमिता आणि बिग बॉस ओटीटीच्या घरातील स्पर्धक अभिनेता राकेश बापट सध्या चर्चेत आहेत. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान राकेशने त्याच्या खासगी आयुष्याविषयी वक्तव्य केले आहे.

बिग बॉस ओटीटीच्या घरात नुकताच नॉमिनेशन टास्क पार पडला. या टास्कदरम्यान शमिता आणि राकेश यांच्यामध्ये गैरसमज झाले. त्यानंतर त्या दोघांमध्ये वाद देखील झाल्याचे पाहायला मिळाले. पण नंतर गार्डन एरिआमध्ये बसून त्या दोघांनी गैरसमज दूर केले. दरम्यान राकेशने शमिताला त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या.

आणखी वाचा : ४२ वर्षांची शमिता शेट्टी पडली राकेश बापटच्या प्रेमात?

 

View this post on Instagram

 

A post shared by Raqesh Bapat (@raqeshbapat)

राकेशने पत्नी रिद्धि डोगराला घटस्फोट देणे आणि त्यानंतर वडिलांचे निधन या दोन घटनानंतर पूर्णपणे कोलमडून गेल्याचे शमिताला सांगितले. पण राकेशने स्वत:ला आणि कुटुंबीयांना सांभाळले असे म्हटले. लहानपणापासून त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचे देखील राकेशने म्हटले आहे.

राकेश आणि रिद्धिची ओळख २०१०मध्ये छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘मर्यादा’च्या सेटवर झाली होती. त्यानंतर ते एकमेकांना डेट करत होते. एक वर्षानंतर २०११मध्ये त्यांनी लग्न केले. ते सर्वांचे लाडके कपल होते. पण लग्नाच्या ८ वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. २०१९मध्ये ते दोघे विभक्त झाले.

‘घटस्फोटानंतर कोलमडून गेलो होतो. एक वेळ अशी होती की मी दोन आठवडे झोपू शकलो नव्हतो. मी आतून तुटलो होतो. माझी आणि आणि माझी बहिण मला अशा परिस्थितीमध्ये पाहून घाबरल्या होत्या. त्यांना धक्कात बसला होता’ असे राकेश म्हणाला. राकेशचे बोलणे ऐकून शमिताने त्याला मिठी मारली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss ott raqesh bapat opens up on his divorce with ridhi dogra avb

ताज्या बातम्या