करण जहरच्या बिग बॉस ओटीटीमध्ये झळकणार शमिता शेट्टी?

नुकतंच गाजलेल्या राज कुंद्रा प्रकरणात शमिता शेट्टी चर्चेत…अभिनेत्री शिल्पा शेट्टीची आहे बहीण.

shamira-shetty-bigg-boss-ott

‘बिग बॉस ओटीटी’ येत्या ८ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या शोसाठी प्रेक्षक खूपच उत्सुक झाले आहेत. आतापर्यंतच्या सगळ्या सीजनपेक्षा यंदाचा सीजन खूपच क्रेझी ठरणार आहे. जस जसं ‘बिग बॉस ओटीटी’ची रिलीज डेट जवळ येतेय तस तसं या शोसाठी स्पर्धकांची नावं समोर येताना दिसून येतेय. त्यातच गायक नेहा भसीन हिचं नाव कन्फर्म झालंय. इतर स्पर्धकांच्या नावावर अद्याप कोणतंही कन्फर्मेशन मिळालं नाही. आणखी बरेच लोकप्रिय चेहरे या शोमध्ये झळकणार असल्याचं बोललं जातंय. यात नुकतंच गाजलेल्या राज कुंद्रा प्रकरणात समोर आलेल्या शमिता शेट्टीच्या नावावर सुद्धा चर्चा सुरूयं.

एका माध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस ओटीटी’साठी बॉलिवूडमधील दोन अभिनेत्रींना अप्रोच करण्यात आलंय. यात अभिनेत्री मलायका शेरावत हिचं सुद्धा नाव आहे. नुकतंच गाजत असलेल्या राज कुंद्रा प्रकरणात चर्चेत आलेली शमिता शेट्टी हिचा सुद्धा ‘बिग बॉस ओटीटी’साठी अप्रोच करण्यात आल्याचं कळतंय. पण अभिनेत्री शमिता शेट्टी बिग बॉस ओटीटीमध्ये झळकणार आहे की नाही, याबाबत मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अश्लील चित्रपट प्रकरणात राज कुंद्राच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी संकटात सापडली आहे. एकीकडे आर्थिक नुकसान तर दुसरीकडे राज कुंद्रा प्रकरणाची टांगती तलवार अशा अवघड परिस्थितीचा ती सामना करतेय. तिच्या या कठीण काळात शिल्पाची बहीण शमिता शेट्टी तिला आधार देतेय. शमिता शेट्टी ही शिल्पा शेट्टीची बहीण आहे. शमिता केवळ शिल्पाचीच नव्हे तर, मेहुणा राज कुंद्राची देखील लाडकी आहे आणि ती त्यांच्याबरोबर व बहिणीसमवेत पार्टी किंवा सुट्टीवर जायची.

शमिता शेट्टीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘मोहब्बते’ मधून तिने डेब्यू केलं होतं. अनेक चित्रपटांच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या टीव्ही शो मध्ये काम केलंय. ‘झलक दिखला जा’ आणि ‘खतरों के खिलाडी’ या लोकप्रिय शो मध्ये ती झळकली आहे. यापूर्वी सुद्धा २००९ साली तिने ‘बिग बॉस’ या शो मधेही भाग घेतला होता. नुकतीच ती ‘ब्लॅक विडोज’ या वेबसीरिजमध्ये झळकली होती. शमिता एक उत्तम इंटिरिअर डिझायनर आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bigg boss ott shamita shetty approached for karan johar show prp

ताज्या बातम्या