BB OTT : महिलांवर केलेल्या ‘या’ कमेंटमुळे करण जोहरने राकेश बापटला खडसावले

करण जोहर ‘बिग बॉस ओटीटी’चे सुत्रसंचालन करत आहे.

karan johar, raqesh bapat, bb ott,
करण जोहर 'बिग बॉस ओटीटी'चे सुत्रसंचालन करत आहे.
‘बिग बॉस ओटीटी’ हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरात असलेले स्पर्धक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. कधी ते कोणत्या स्पर्धकाची स्तुती करतात तर कधी त्याची निंदा करतात. यावेळी महिलांवर केलेले कमेंटवरून राकेशला ‘बिग बॉस ओटीटी’चा सुत्रसंचालक करण जोहरने खडसावले आहे.

पुरुष हे स्त्रियांपेक्षा जास्त बलवान असतात किंवा त्यांच्यात जास्त ताकद असते असे विधान राकेशने केले. यावरून करणने राकेशला खडसावले आहे. करण राकेशला म्हणाला, ‘तू महिलांविषयी असे बोलायल नव्हते पाहिजे. आपण आज अशा जगात जगत आहोत जिथे कोणीही कोणापेक्षा कमी नाही.’ यावर स्पष्टीकरण देत राकेश म्हणाला, ‘महिलांमध्ये किती शक्ती आहे हे मला माहित आहे. महिला असलेल्या घरात मी लहानाचा मोठा झालो आहे.’

आणखी वाचा : “…म्हणून आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय”; ‘तारक मेहता…’फेम मुनमुन संतापली

 

View this post on Instagram

 

A post shared by Voot (@voot)

आणखी वाचा : मुनमुन दत्तानंतर ‘तारक मेहता..’ फेम राजने सोशल मीडियावरुन रिलेशनशिपबद्दल केलं भाष्य

तर दुसरीकडे शमिता नेहा भसीनला म्हणाली, काही दिवसांपासून राकेश बापटच्या वागण्यात बदल झाला आहे आणि त्यामुळे ती दुखावली आहे. राकेशच्या मनात दिव्या अग्रवालसाठी सहानुभूती आहे. ‘चार आठवडे एकत्र राहिल्यानंतर आता राकेशच्या स्वभावात बदल झाला आहे. तिला वाटतं की ती त्याच्या पाठी लागली आहे आणि त्याला तिच्यापासून लांब रहायचे आहे.  आमचं रिलेशनशिप हे जबरदस्तीचं असल्या सारखं मला वाटतं. मला आता माझा वेळ वाया घालवायचा नाही.’

दरम्यान, शमिता आणि दिव्या अग्रवालमध्ये एकदा भांडण झालं होतं. त्यावेळी राकेशने दिव्याची बाजू घेतली होती. तेव्हापासून राकेश आणि शमिता एकमेकांशी बोलत नाही आहेत. तर या आधी शमिता नेहाला म्हणाली होती की राकेश तिच्यासाठी बनलेला नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bigg boss ott update karan johar scolds raqesh bapat on his absurd comment on women dcp