‘बिग बॉस ओटीटी’ हा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय शो आहे. या शोमधून पहिल्याच आठवड्यात उर्फी जावेद बाहेर पडली. मात्र त्यानंतर तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती चर्चेत आली होती. उर्फीने तिच्या बोल्ड अंदाजासोबतच तिच्या हटके स्टाइलने अनेकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कधी ब्रॉ फ्लॉन्ट केल्याने तर कधी पॅन्टचं बटन न लावल्याने उर्फी जावेद चर्चेत आली होती. तिच्या या हटके फॅशनमुळे तिला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल देखील केलं होतं. यानंतर पुन्हा एकदा उर्फीने बॅकलेस पण विचित्र असा टॉप परिधान केला आहे. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
उर्फीने दोन दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ आणि काही फोटो पोस्ट केले आहेत. यात तिने बॅकलेस पण विचित्र टॉप परिधान केला आहे. त्यासोबत पांढऱ्या रंगाची पँट तिने घातली आहे. उर्फीचे हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा हटके लूक पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
हा फोटो शेअर करतेवेळी तिने कोंबडी आधी की अंड? असा प्रश्न विचारला आहे. तिचा हा प्रश्न पाहून नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट उत्तर दिली आहेत. या प्रश्नाचे उत्तर नासाला माहिती असेल, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे.
उर्फीचा हा लूक पाहून काहींनी कशाला घातलंस? असा सवाल केला आहे. तर एका नेटकऱ्याने डेटॉलने कंबर साफ कर, डाग दिसतायत? अशी कमेंट केली आहे. तू यापेक्षा चांगलं काही तरी घालू शकली असतीस? असेही एक नेटकरी तिला म्हणाला आहे.

“हिला कपडे न घालता प्रसिद्धी हवी आहे. हिंदू असो किंवा मुसलमान… कोणतेही पालक किंवा भाऊ-बहिण अशा अवतारात तुला पाहू शकत नाही,” अशी कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेदला तिच्या कपड्यांवरून नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलंय. एअरपोर्टवर ब्रॉ फ्लॉन्ट केल्याने ती सर्वात आधी चर्चेत आली होती. त्यानंतर बोल्ड लूक आणि बॅकसेल टॉपमुळे देखील उर्फीने नेटकऱ्यांची टीका ओढावून घेतली होती. तर नुकत्याच परिधान केलेल्या बॅकलेस ड्रेसमुळे देखील नेटकऱ्यांनी उर्फीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.