अभिजात चित्रपटांचा पेटारा प्रेक्षकांसाठी खुला करणाऱ्या ‘झी क्लासिक’ वाहिनीवर सध्या दिग्गज चित्रपट दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या जुन्या चित्रपटांचा नजराणा मिळणार आहे. बिमल रॉय यांच्या ५० व्या पुण्यतिथी निमित्त ‘बिमल रॉय महोत्सवा’चे आयोजन वाहिनीवर करण्यात आले आहे. बिमल रॉय यांच्या आयुष्यातील किस्से, घटना उलगडत त्यांचे चित्रपट पाहण्याची पर्वणी सध्या प्रेक्षकांना उपलब्ध झाली आहे.

‘झी क्लासिक’ वाहिनीवर बिमल रॉय यांचे पाच चित्रपट दर शनिवारी रात्री आठ वाजता दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटांदरम्यान बिमल रॉय यांचे किस्से अभिनेता बोमन इराणी सांगणार आहेत. बिमलदांचे ‘दो बिघा जमीन’, ‘देवदास’, ‘मधुमती’, ‘सुजाता’ आणि ‘बंदिनी’ असे पाच चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. बिमलदांचे चित्रपट, त्यांचे किस्से सादर करण्याच्या कल्पनेनेच आपल्याला आनंद झाला आहे, असे बोमन इराणी यांनी सांगितले. ‘बिमलदा स्वत:च एक चित्रपटाची शाळा होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.