कुणी तरी येणार गं! बिपाशा बासू होणार आई, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी | bipasha basu karan singh grover announce pregnancy share baby bump photos see details | Loksatta

कुणी तरी येणार गं! बिपाशा बासू होणार आई, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी

बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

कुणी तरी येणार गं! बिपाशा बासू होणार आई, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी
बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवरच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनंतर आता बॉलिवूडमधील आणखी एक कपल लवकरच आई-बाबा होणार आहेत. अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार असल्याच्या गेल्या काही दिवसांपासून फक्त चर्चा होत्या. पण आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे. बिपाशाने गरोदरपणातील फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याचं सांगितलं आहे.

बिपाशाने पती करणबरोबर खास फोटोशूट केलं आहे. दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करत ग्लॅमरस फोटोशूट करत चाहत्यांना गोड बातमी दिली. या फोटोमध्ये बिपाशा गरोदर असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. तसेच तिचं बेबी बम्पही पाहायला मिळत आहे. बिपाशाने फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

पाहा फोटो

बिपाशा म्हणाली, “नवी वेळ, नवी सुरुवात आणि नवा प्रकाश आमच्या आयुष्यामध्ये आला आहे. आम्ही दोघांनीच नव्या आयुष्याला सुरुवात केली आणि तेव्हापासून आम्ही फक्त दोघंच होतं. एकमेकांवरच फक्त खूप प्रेम करायचं हे थोडं अयोग्य वाटलं. म्हणून आता लवकरच आम्ही दोनाचे तीन होणार आहोत. लवकरच आमचं बाळ आमच्याबरोबर असेल आणि आमचा आनंद द्विगुणीत होईल.”

आणखी वाचा – “त्याक्षणी डोळ्यात पाणी आलं अन्…” कौतुक करत अमिताभ बच्चन जेव्हा समीर चौगुलेच्या पाया पडले

बिपाशाने हे सुंदर फोटो शेअर करताच चाहत्यांसह कलाविश्वातील अनेक मंडळींनी या सेलिब्रिटी कपलला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. बिपाशा-करणने आपण आई-बाबा होणार हे जाहिर करताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद देखील दिसून येत आहे. शिवाय बिपाशाचा प्रेग्नेंसी ग्लो विशेष लक्षवेधी आहे. एकूणच काय तर बिपाशा-करणच्या आयुष्याची आता नवी सुरुवात झाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कियाराच्या व्हिडिओवर सिद्धार्थ मल्होत्राची कॉमेंट, चाहते म्हणतात “लग्न करण्याआधी…”

संबंधित बातम्या

स्वप्निल जोशीने झोमॅटो अ‍ॅपबद्दल केली तक्रार, ट्वीट करत कंपनी म्हणाली “यावर उपाय…”
‘काश्मीर फाइल्स’वरील टीकेनंतर पहिली प्रतिक्रिया काय होती, अनुपम खेर म्हणाले, “हिंसक होती, मनात आलं की…”
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल
“आता लवकरच…” लग्नानंतरची पाठकबाईंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“तुम्ही जन्मत:च हिंस्र विकृत आहात की…” सुमीत राघवनला नेटकऱ्याचा प्रश्न; अभिनेत्याच्या आरे कारशेडवरील ‘त्या’ वादग्रस्त ट्वीटनंतर रंगले ट्विटर वॉर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी होते ज्यांनी…”, ‘काश्मीर फाइल्स’वर बोलताना अनुपम खेरांचं वक्तव्य
“माझ्या लग्नात…” हार्दिक जोशीसह विवाहबंधनात अडकल्यानंतर अक्षया देवधरने शेअर केली खास पोस्ट
पुणे: ३६ व्या आंतरराष्ट्रीय नाईट मॅरेथॉन स्पर्धा; इथिओपियाच्या स्पर्धकांनी मारली बाजी
संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले “…तर सरकारला अमित शाहादेखील वाचवू शकणार नाहीत”
“इंग्रजी भाषा महत्त्वाची आहे पण…” प्रथमेश परबने केलेली पोस्ट चर्चेत