scorecardresearch

लक्षवेधी सजावट, जंगी पार्टी अन्…; बिपाशा बासूने दुसऱ्यांदा केला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

बिपाशा बासूच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

लक्षवेधी सजावट, जंगी पार्टी अन्…; बिपाशा बासूने दुसऱ्यांदा केला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम
बिपाशा बासूच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनंतर आता बॉलिवूडमधील आणखी एक कपल लवकरच आई-बाबा होणार आहेत. अभिनेत्री बिपाशा बासू व अभिनेता करण सिंह ग्रोवर यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. बिपाशा-करणने काही महिन्यांपूर्वीच ही आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली. सध्या दोघंही खूप आनंदात आहेत. अलिकडेच बिपाशाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. आता दुसऱ्यांदा तिने हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

बिपाशाचा बंगाली पद्धतीने डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. आता पुन्हा एकदा तिने हा कार्यक्रम करण्याचं ठरवलं. तिच्या दुसऱ्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये बिपाशा-करण फारच गोड दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

बिपाशाने पिच रंगाचा गाऊन परिधान केला आहे. तर करणने निळ्या रंगाचा कोट व त्याच रंगाची पँट परिधान केली आहे. बिपाशा-करणने मुंबईमध्ये डोहाळे जेवणाचं अगदी जंगी सेलिब्रेशन केलं असल्याचं या व्हायरल झालेल्या फोटो व व्हिडीओमधून दिसून येत आहे. फुग्यांचं तसेच फुलांचं डेकोरेशन, कलाकारांची हजेरी यामुळे बिपाशाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – तरुण दिसण्यासाठी ५० हजार रुपयांची क्रिम खरेदी केली अन्…; तब्बूनेच सांगितला ‘तो’ किस्सा

“माझा नवरा आता वडील होणार आहे. तरीही तो स्वतः अजूनही छोटसं बाळच आहे.” असं बिपाशा एका व्हिडीओमध्ये करणबाबत बोलताना दिसत आहे. तसेच डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामध्ये दोघांनीही केक कट करत एकमेकांना भरवला. यावेळी हे सेलिब्रिटी कपल फारच खूश दिसत होतं. बिपाशा-करण आपल्या बाळाच्या स्वागतासाठी जंगी तयारी करत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bipasha basu karan singh grover mom dad soon actress second baby shower photos video goes viral on social media kmd

ताज्या बातम्या