बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा आज वाढदिवस आहे. आयुष्मानचा जन्म १४ सप्टेंबर १९८४ साली चंदीगढमध्ये झाला होता. आयुष्मान त्याच्या अनोख्या अभिनयाच्या खास अंदाजाने बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलंय. वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमा करत त्यानो प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. आज आयुष्मानने नाव कमावलं असलं तरी करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याला देखील मोठा संघर्ष करावा लागलाय.

काही दिवसांपूर्वीच आयुष्मान खुरानाने अरबाज खानच्या ‘पिंच-2’ या शोमध्ये करिअरसोबतच खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. बॉलिवूडमध्ये जर यश मिळालं नसतं तर आपण पार्ट्यांमध्ये गाणं गाण्यासाठी आणि डान्स करण्यासाठी देखील तयार होतो असं तो यावेळी म्हणाला होता.

हे देखील वाचा: गौतमीने शेअर केला पती राम कपूरसोबतचा हनीमूनचा ‘तो’ फोटो; नेटकरी म्हणाले…

आयुष्यामानने पुस्तक लिहिण्यामागचं कारणं केलं स्पष्ट

‘विकी डोनर’ या सिनेमातून आयुष्मान खुराणाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमाच्या अवघ्या तीन वर्षांत नंतरच त्याने ‘क्रॅकिंग कोड:माय जर्नी इन बॉलीवूड ‘ हे आत्मचरित्र लिहिलं आहे. 2015 सालामध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं. कारकिर्दीचा सुरुवातीला आयुष्मानने आत्मचरित्र लिहिल्याने सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. ‘पिंच-2’ या शोमध्ये अरबाज खानने ट्विटरवरील आयुष्मान वर टीका करणारे काही ट्वीट वाचून दाखवले.

या ट्वीटवर प्रतिक्रिया देत आयुष्मान खुराणा म्हणाला, “माझ्या पहिल्या चित्रपटा नंतर, माझे तीन सिनेमा बॅक-टू-बॅक फ्लॉप गेले. लोक माझ्याबद्दल लिहू लागले होते. मी पुन्हा घरी जाण्याचा विचार करत होतो. त्यावेळी मी अशा स्थितीतून जात होतो की माझ्याकडे वेळही होता म्हणून मी पुस्तक लिहिले.”

हे देखील वाचा: सरकारचा प्रचार करणारे सिनेमा बनवले जात आहेत, नाझी जर्मनीत हेच व्हायचं- नसीरुद्दीन शाह

मी पार्टीत गाण्याचा विचार केला होता

पुढे तो म्हणाला, “पण आता मी अशा टप्प्यावर आहे जिथे माझ्याकडे पुस्तक लिहायला वेळ नाही आणि कामही व्यवस्थित चालू आहे. त्यावेळी काहीही काम नव्हतं. माझा एक बँड होता. मी विचार केला जरी माझे सिनेमा चालले नाहीत तर मी बर्थडे पार्टी किंवा इतर पार्ट्यांमध्ये गाणं गाऊन किंवा डान्स करून लोकांचं मनोरंजन करेन. माझे सिनेमा चालले नाहीत तर मी कोण कोणत्या गोष्टी करू शकतो याचा विचार मी सतत करायचो.” असं आयुष्मान म्हणाला.