scorecardresearch

Birthday Special : डान्स करुन पेनची विक्री ते विनोदाचे बादशाह, जॉनी लिवर यांच्याबद्दल या गोष्टी माहितीये का?

बॉलिवूडचे कॉमेडी किंग जॉनी लिवर यांचा आज वाढदिवस आहे.

Birthday Special : डान्स करुन पेनची विक्री ते विनोदाचे बादशाह, जॉनी लिवर यांच्याबद्दल या गोष्टी माहितीये का?
बॉलिवूडचे कॉमेडी किंग जॉनी लिवर यांचा आज वाढदिवस आहे.

बॉलिवूडमधील विनोदाचे बादशाह जॉनी लिवर यांचा आज (१४ ऑगस्ट) वाढदिवस आहे. गेली अनेक वर्ष त्यांच्या विनोदी शैलीतून ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आतापर्यंत ३०० हून अधिक चित्रपट त्यांनी केले आहेत. उत्तम अभिनयाच्या जोरावर त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. बॉलिवूडशी कोणताही संबंध नसताना, कोणाचीही शिफारस न मिळवता जॉनी लिवर यांनी हे यश कसे संपादन केले याबद्दल फार कमी जणांना माहिती आहे.

जॉनी लिवर यांचे मूळ नाव जॉन प्रकाश राव जनुमाला आहे. त्यांचे मित्र त्यांना ‘जॉनी लिवर’ या नावाने हाक मारायचे. कॉमेडीचे किंग असणारे जॉनी लिवर यांनी खूप कष्ट करून सिनेसृष्टीत यश मिळवलं आहे. लहानपणी त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. त्यामुळे त्यांनी कुटुंबासाठी शिक्षण सोडून पेन विकण्याचे काम करायचे ठरवले. लहानपणापासूनच ते मिश्किल स्वभावाचे होते. ते पेन विकताना बॉलिवूड कलाकारांप्रमाणे डान्स करून पेन विकायचे. त्यामुळे त्यांची विक्री चांगली व्हायची. त्यानंतर त्यांनी काही काळ ‘हिंदुस्थान लिवर’मध्ये देखील काम केले.यावेळी ते सतत कोणत्या ना कोणत्या कलाकारांचे अभिनय करून मित्रांचे मनोरंजन करायचे. तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना जॉनी लिवर अशी हाक मारण्यास सुरुवात केली आणि पुढे त्याच नावाने त्यांना सर्वजण ओळखू लागले.

आणखी वाचा – ‘नेक्स्ट मिशन बॉयकॉट पठाण’, आमिर खान, अक्षय कुमारपाठोपाठ शाहरुख खान ट्रोलर्सच्या निशाण्यावर

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी जॉनी लिवर स्टॅंडअप कॉमेडी करायचे. तिथूनच त्यांचा बॉलिवूडमधील प्रवास सुरू झाला. एकदा स्टॅंडअप कॉमेडी करत असताना सुनील दत्त यांनी त्यांना पाहिले. सुनील दत्त यांनी त्यांना ‘दर्द का रिश्ता’ या चित्रपटातील एका भूमिकेसाठी विचारले आणि तिथून जॉनी लिवर यांच्या बॉलिवूड प्रवासाला सुरुवात झाली. जी आजतागायत कायम आहे.

आणखी वाचा – अक्षय कुमारच्या चित्रपटांना प्रेक्षक मिळेना, सलग तीन चित्रपट सुपरफ्लॉप ठरल्यानंतर ‘रक्षाबंधन’लाही थंड प्रतिसाद

काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत जॉनी लिवर यांनी त्यांच्या आयुष्यातल्या एका कठीण प्रसंगाविषयी सांगितले. त्यांनी सांगितले, “ते दोन दिवस मी कधीच विसरणार नाही. माझ्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पायाचे ऑपरेशन होणार होते. पण मला त्यांना त्या अवस्थेत सोडून शूटिंगसाठी जावे लागले. इतक्या गंभीर परिस्थितीत मी विनोदी सीनची तयारी करत होतो.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या