Birthday Special : हा अभिनेता वयाच्या ४५व्या वर्षी ठरला आशियातील सर्वात सेक्सी पुरुष

या अभिनेत्याला गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक मते मिळाली आहेत

लाखो तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे हृतिक रोशन. आज १० जानेवारी रोजी हृतिकचा ४५वा वाढदिवस आहे. पण वय हा केवळ एक आवडा असतो हे हृतिकने सिद्ध करुन दाखवले आहे. काही दिवसांपूर्वी हृतिकने ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष २०१९’च्या यादीमध्ये स्थान पटकावले आहे.

ब्रिटनच्या इस्टर्न आय या मॅगझिनने ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुषा’च्या नावासाठी ऑनलाइन पोल घेतला होता. यामध्ये बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला सर्वाधिक मते मिळाली. गेल्या दहा वर्षांमधील सर्वाधिक मते मिळवत हृतिकने ‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष २०१९’चा मान मिळवला आहे. हृतिकच्या चाहत्यांसाठी हा सुखद धक्काच आहे.

 

View this post on Instagram

 

The calm before the storm? Cause the real #War is just about to begin.

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

हा मान मिळवल्यानंतर हृतिकने सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्वांचे आभार मानले. ‘सर्वप्रथम मला मत दिलेल्यांचे मनापासून आभार. एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये व्यक्तीचे दिसणे माझ्यासाठी महत्त्वाचे नसते. मी एखाद्या व्यक्तीच्या दिसण्यावरुन परिक्षण करत नाही. त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यात काय मिळवले आहे, त्याचा जीवन प्रवास कसा होता आणि एखाद्या गोष्टीला ती व्यक्ती कशी सामोरी जाते हे मी पाहतो’ असे हृतिक म्हणाला.

पाहा फोटो : बॉलिवूडमध्ये चोरीचा मामला? हॉलिवूड चित्रपटांचे पोस्टर केले कॉपी

हृतिकने १९८० साली बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर त्याने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटात काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘बँग बँग’, ‘जोधा अकबर’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘क्रिश’, ‘सुपर ३०’, ‘वॉर’ असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Birthday special hrithik roshan voted sexiest asian male of the decade avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या