सलमान आणि जुही करणार होते लग्न, पण वडिलांनी…

एका जुन्या मुलाखतीत खुद्द सलमानने याचा खुलासा केला होता.

Birthday special, juhi chawla, salman khan, salman khan wife,

बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला ही गेल्या काही दिवसांपासून चित्रपटात दिसत नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. ती सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. ‘इश्क’, ‘येस बॉस’,’दिवाना मस्ताना’ यासारख्या सुपरहिट चित्रपट देणारी जुही ९०च्या दशकात अतिशय लोकप्रिय होती. त्यामुळे तिच्यासोबत लग्न व्हावं अशी प्रत्येक तरुणाची इच्छा होती. बॉलिवूडमधील करिअर शिखरावर असताना तिने १९९५ मध्ये व्यावसायिक जय मेहताशी लग्न केलं. त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुलं आहेत. पण तुम्हाला माहितीये का बॉलिवूडचा भाईजान सलमान खान देखील जुहीच्या प्रेमात होता. त्याने जुहीच्या वडिलांकडे तिच्याशी लग्न करण्याची मागणी घातली होती.

बॉलिवूडमध्ये दबंगगिरी करणारा सलमान अजूनपर्यंत अविवाहित असल्यामुळे त्याला प्रत्येक कार्यक्रमात किंवा समारंभामध्ये लग्नाविषयी विचारणा होत असते. मात्र प्रत्येक वेळी सलमान वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत सलमानच्या आयुष्यात अनेक तरुणी आल्या असून ऐश्वर्या रायबरोबरचं नातं चांगलंच गाजलं होतं. मात्र प्रत्यक्षात सलमानला एका वेगळ्याच अभिनेत्रीबरोबर लग्न करणार होता. सलमानने स्वत: एका मुलाखतीमध्ये हे मान्य केले होते.
आणखी वाचा : भर इंटरव्ह्यूमध्ये ऐश्वर्याने अभिषेकला सांगितले किस करायला, व्हिडीओ व्हायरल

एका मुलाखतीमध्ये स्वत: सलमानने जुही चावलाची प्रशंसा केली होती. ‘जुही ही एक चांगली मुलगी आणि गुणी अभिनेत्री आहे. त्यामुळे ती एक उत्तम सुन आणि पत्नी होऊ शकते असे मला वाटले होते. त्यामुळे मी तिच्या वडीलांकडेदेखील लग्नासाठी जुहीचा हात मागितला होता. मात्र त्यांना अपेक्षित असलेल्या जावयाच्या चौकटीमध्ये मी बसत नसल्यामुळे त्यांनी मला नकार दिला’, असे सलमानने म्हटले होते.

दरम्यान, त्या काळामध्ये जुही एक आघाडीची अभिनेत्री असल्यामुळे ती निवडक अभिनेत्यांबरोबरच काम करण्याला पसंती देत होती. यातच एका दिग्दर्शकांनी जुहीला सलमानबरोबर एका चित्रपटासाठी स्क्रिन शेअर करायला सांगितली होती.मात्र जुहीने नकार दिला होता. विशेष म्हणजे असं असूनही सलमानला तिच्याबरोबरच लग्न करायचं होतं.

जुहीने जय मेहताशी गुपचूप लग्न केले होते. फक्त ठराविक लोकांनाच तिच्या लग्नाची माहिती होती. लग्नाबद्दल समजल्यानंतर करिअरला ब्रेक लागू नये म्हणून गुपचूप लग्न केल्याची कबुली तिने नंतर एका मुलाखतीत दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Birthday special juhi chawla salman khan wants to marry with her but father not agree avb

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या