कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे काजोल, एका चित्रपटासाठी घेते ‘इतके’ मानधन

जाणून घ्या काजोलच्या एकूण संपत्ती विषयी..

kajol, Net Worth, kajol total property, kajol money, kajol fees,

आपल्या अभिनय कौशल्याने एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री म्हणजे काजोल. तिचे लाखो चाहते आहेत. काजोलने वयाच्या १६व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्यावहिल्या चित्रपटाने काजोल चांगली ओळख मिळवून दिली होती. त्यानंतर तिचा ‘बाजीगर’ हा चित्रपट हिट ठरला आणि काजोलचे संपूर्ण आयुष्य बदलले. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम करत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. आज ५ ऑगस्ट रोजी काजोलचा वाढदिवस. त्या निमित्ताने चला जाणून घेऊया तिच्या विषयी काही खास गोष्टी..

काजोल सध्या मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसत असली तरी ती अनेक ब्रँडची अॅम्बेसेडर आहे. ती चित्रपट आणि जाहिरातींसाठी तडगे मानधन घेते. ती कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे. caknowledge.com दिलेल्या वृत्तानुसार काजोलकडे १८० कोटी रुपयांची संपत्ती आहे. काजोल एका चित्रपटासाठी जवळपास ४ कोटी रुपये मानधन घेत असल्याचे देखील म्हटले जाते.

पाहा : काजोल आणि अजय देवगणचा बंगला आहे की ‘5 स्टार’ हॉटेल?; हे फोटो पाहा

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

काजोलचा मुंबईत जुहू येथे आलिशान बंगला आहे. तिच्या बंगल्याचे नाव शिव शक्ती आहे. तसेच काजोलकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. आजवर काजोलला तिच्या चित्रपटांसाठी ६ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. २०१३मध्ये तिला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता.

काही दिवसांपूर्वी काजोलचा ‘त्रिभंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Birthday special know about kajol net worth and how much she charged for one film avb

ताज्या बातम्या