लोकप्रिय अभिनेता वरुण धवन याचे वडील, सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन हे आज म्हणजेच १६ ऑगस्ट ऑगस्ट रोजी त्यांचा ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. १९५१ साली त्यांचा जन्म आगरतळा येथे झाला आणि नंतर ते कानपूरला स्थायिक झाले. डेव्हिड धवन यांचे वडील युको बँकेत व्यवस्थापक होते. दिग्दर्शनाकडे वळण्यापूर्वी डेव्हिड धवन यांनी संपादक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर ते दिग्दर्शनाकडे वळले. संजय दत्त आणि गोविंदा यांच्या भूमिका असलेला १९८९ साली प्रदर्शित झालेला ‘तक्तावर’ हा दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यांनी बनवलेले कॉमेडी चित्रपट सुपरहिट झाले. ‘कुली नंबर १’, ‘जुडवा’ आणि ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ यांसारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांना भरपूर हसवलं. आज डेव्हिड धवन यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त अशाच काही लोकप्रिय चित्रपटांची माहिती घेऊया.

आणखी वाचा : अखेर प्रतीक्षा संपली..’या’ दिवशी येणार अभिनेता ईशान खट्टरचा ‘पिप्पा’

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’

१. मिस्टर अँड मिसेस खिलाडी (१९९७): अक्षय कुमार आणि जूही चावला यांची प्रमुख भूमिका असलेला हा खिलाडी चित्रपटाच्या सिरिजमधील पाचवा पाचवा चित्रपट आहे. आणि इतर चित्रपटांपेक्षा तो खूप वेगळा आहे. यात कॉमेडी दाखवण्यात आली होती. या चित्रपटात अक्षय कुमार आपल्या काकांच्या आणि ज्योतिषाच्या बोलण्यावर खूप विश्वास ठेवणाऱ्या एका आळशी तरुणाच्या भूमिकेत दिसला आहे.

२. बनारसी बाबू (१९९७): हा चित्रपट विल्यम शेक्सपियरच्या ‘द टेमिंग ऑफ द श्रू’ आणि १९७२ सालच्या तमिळ चित्रपट पट्टिकाडा पट्टनामा यांच्यापासून प्रेरित आहे. या चित्रपटात गोविंदा, रम्या, कादर खान, शक्ती कपूर आणि बिंदू यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

३. जुडवा (१९९७): करिश्मा कपूर आणि रंभा हे कलाकार या चित्रपटात झळकले आहेत. यासोबतच या चित्रपटाचे विशेष आकर्षण म्हणजे यात अभिनेता सलमान खान दुहेरी भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने डेव्हिड धवन यांनी पहिल्यांदाच सलमान खानबरोबर काम केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तूफान यशस्वी ठरला. जसे या चित्रपटाचे नाव आहे, तशीच या चित्रपटाची गोष्ट आहे. जुळ्या भावांना जन्मावेळी वेगळे केले जाते आणि त्यांचे जीवन कसे उलगडते याबद्दलचा हा चित्रपट खूपच विनोदी आहे. त्यानंतर या चित्रपटाचा दूसरा भाग ‘जुडवा २’ त्यांनी आपला मुलगा वरुण धवनसोबत बनवला.

४. हिरो नंबर १ (१९९७): १९९७ साली डेव्हिड धवन यांनी गोविंदला घेऊन २ चित्रपट केले, त्यातलाच हा एक चित्रपट. या चित्रपटात गोविंद आणि करिश्मा कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘शेफ’पासून प्रेरित आहे.

हेही वाचा : Tiger 3 Release Date : ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘टायगर-३,’ विशेष व्हिडीओ पोस्ट करत सलमान खानने जाहीर केली तारीख

५. बडे मियाँ छोटे मियाँ (१९९८): या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि गोविंदा यांनी दुहेरी भूमिका साकारल्या. तर अभिनेता रम्या कृष्णन, रवीना टंडन आणि अनुपम खेर हे नावाजलेले कलाकार या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत आपल्याला दिसले.

६. बीवी नंबर १ (१९९९): सलमान खान, करिश्मा कपूर, सुष्मिता सेन, अनिल कपूर आणि तब्बू यांच्या लोकप्रिय कलाकारांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या. हा चित्रपट रिलीजच्या वेळी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा बॉलिवूड चित्रपट ठरला.