‘त्या’ भयानक अपघातानंतर शक्ती कपूर यांचे संपूर्ण आयुष्य बदलले | Loksatta

‘त्या’ भयानक अपघातानंतर शक्ती कपूर यांचे संपूर्ण आयुष्य बदलले

जाणून घ्या शक्ती कपूर यांच्याविषयी खास गोष्टी

‘त्या’ भयानक अपघातानंतर शक्ती कपूर यांचे संपूर्ण आयुष्य बदलले

चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत बॉलिवूडचा खलनायक ठरलेला ‘क्राइम मास्टर गोगो’ अर्थात अभिनेता शक्ती कपूरचा आज ३ सप्टेंबर रोजी वाढदिवस. चित्रपटांमध्ये अनेक वेळा खलनायकाची भूमिका साकारल्यामुळे शक्ती कपूर यांना ‘बॅड बॉय’ हे नाव मिळाले. चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेला एक वेगळी उंची गाठून दिल्यानंतर शक्ती कपूर यांनी विनोदी कलाकाराच्याही भूमिका अत्यंत खुबीने वठविल्या. विशेष म्हणजे लोकप्रिय ठरलेल्या या कलाकाराला एका अपघातामुळे पहिला ब्रेक मिळाला. एका रिअॅलिटी शोमध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या चित्रपटाविषयीचा काही रंजक किस्सा सांगितला होता.

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक फिरोज खान यांच्यामुळे शक्ती यांना कलाविश्वामध्ये पहिला ब्रेक मिळाला. करिअरच्या सुरुवातीला ज्यावेळी शक्ती हे स्ट्रगल करत होते त्यावेळी एकेदिवशी अचानक लिंकिंग रोडवर शक्ती यांची गाडी फिरोज खान यांच्या मर्सिडिज गाडीला जाऊन धडकली. मर्सिडिज गाडीला धडक बसल्यानंतर शक्ती घाईघाईमध्ये गाडीतून बाहेर पडले. त्यावेळी शक्ती यांच्या समोर एक सहा फूट उंच माणूस उभा होता. हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून चक्क फिरोज खान होते. विशेष म्हणजे फिरोज खान यांना असं समोर पाहिल्यानंतर शक्ती यांनी लगेचच त्यांना स्वत:च नाव आणि पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचा डिप्लोमा केल्याचे सांगितले. इतकेच नाही तर ‘मला तुमच्या चित्रपटात काम करण्याची संधी द्या’, असे ते त्यावेळी म्हणाले. मात्र शक्ती यांचे हे बोलणे ऐकल्यानंतर फिरोज खान पुन्हा गाडीत जाऊन बसले.

दरम्यान, त्याच दिवशी संध्याकाळी शक्ती हे त्यांचा मित्र के. के. शुक्ल यांच्या घरी गेले. त्यावेळी के. के. फिरोज खान यांच्या ‘कुर्बानी’ चित्रपटासाठी लेखनाचे काम करत होते. विशेष म्हणजे त्यावेळी फिरोज खान त्यांच्या चित्रपटातील एका विशिष्ट भूमिकेसाठी, पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधील एका माणसाच्या शोधात आहेत, जो त्यांच्या गाडीला धडकला होता, असे सांगितले. के. के. शुक्ल यांनी सांगितलेली घटना ऐकल्यानंतर शक्ती मोठ्याने ओरडले आणि मीच आहे तो माणूस असे म्हणाले. त्यानंतर त्याची पुन्हा फिरोज खानसोबत भेट झाली आणि त्यांना ‘कुर्बानी’ चित्रपटात पहिली मुख्य भूमिका मिळाली.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-09-2021 at 08:30 IST
Next Story
‘ती’ अ‍ॅडमिट असल्याचं समजताच दीपिका पदुकोणने पाठवले १५ लाख रुपये; मदतीमुळे मिळणार जीवनदान