scorecardresearch

Video : ‘रुख से जरा..’ निधनाआधी सोनाली फोगाट यांनी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट ठरली अखेरची!

सोनाली फोगाट यांचं गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय.

Video : ‘रुख से जरा..’ निधनाआधी सोनाली फोगाट यांनी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट ठरली अखेरची!
भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट निधन

Famous Tiktok Star and BJP Leader Sonali Phogat Death: प्रसिद्ध टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगट यांचं निधन झालं आहे. आज २३ ऑगस्ट रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या वृत्तामुळे अनेकांना धक्का बसला. त्यांच्या लाखो चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार गोव्यात असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झाल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर असंख्य चाहते असलेल्या सोनाली फोगाट यांनी काही तासांपूर्वीच शेअर केलेला व्हिडीओ त्यांची अखेरची पोस्ट ठरली.

सोनाली फोगाट सोशल मीडियावर खूप सक्रिय होत्या. त्या नेहमीच त्यांच्या कामाचे अपडेट्स त्यांच्या चाहत्यांसह शेअर करत असत. पण यासोबत त्या अनेकदा त्यांचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ देखील इन्स्टाग्रामवर शेअर करत असत. त्यांनी काही तासांपूर्वीच एक व्हिडीओ इन्स्टाग्राम रिल्सवर शेअर केला होता. त्यांचा हाच व्हिडीओ त्यांची अखेरची सोशल मीडिया पोस्ट ठरली.
आणखी वाचा-टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सोनाली फोगाट खूपच आनंदी दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर हसू सर्वांची मनं जिंकून घेत आहे. त्यांनी डोक्याला गुलाबी रंगाचा फेटा बांधला आहे आणि या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘रुख से जरा नकाब उठा दो…’ हे गाणं वाजताना ऐकू येत आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली फोगाट खूपच आनंदी आणि एन्जॉय करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता त्या या जगात नाहीत यावर चाहत्यांचाही विश्वास बसत नाहीये.

सोनाली फोगाट यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षाने सोनाली फोगट यांची प्रसिद्धी पाहून हरियाणातील हिस्सार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर भाजपने हरियाणातील महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली होती. सोनाली यांचे पती संजय फोगट यांचेही २०१६ मध्ये निधन झाले होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp leader sonali phogat pass away she posted a video on instagram before death goes viral mrj