बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात ‘अक्षय कुमार’, गेल्या काही वर्षांत खान मंडळींना टक्कर देणारा हा अभिनेता. सर्वात जास्त कर भरणाऱ्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना होते. असे जर असले तरी अक्षय कुमारवर टीका देखील होत असते. कॅनडियन नागरिकक्तवावरून त्याला बरेच ट्रोल केले जाते. अभिनेता अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्यात अपयशी ठरला. ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘बेल बॉटम’, ‘बच्चन पांडे’ हे त्याचे तिन्ही चित्रपट एकापाठोपाठ एक सुपरफ्लॉप ठरले.

आता त्याचा आगामी चित्रपट ‘कठपुतली’ ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचा आणखीन एक चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे तो चित्रपट म्हणजे ‘रामसेतू’. या चित्रपटावरून एक नवा वाद निर्माण झाला आहे. तो वाद थेट कोर्टापर्यंत पोहचला आहे. भाजप नेते आणि माजी राज्यसभा खासदार, सुब्रमण्यम स्वामी म्हणाले की, त्यांनी अक्षय आणि इतर आठ जणांना बौद्धिक संपदा अधिकाराबद्दलची ( intellectual property rights) नोटीस पाठवली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी रविवारी कायदेशीर नोटीस पाठवली आणि ट्विट करते ते म्हणाले की, हिंदी चित्रपटांना तथ्ये चुकीच्या पद्धतीने मांडण्याची सवय आहे, असे आरोप त्यांनी केले.

विजय देवरकोंडा पुन्हा ट्रोल!! हिंदूंच्या भावना दुखावणारा ‘तो’ सीन होतोय व्हायरल

ते पुढे ट्विटमध्ये लिहतात की ‘मुंबई चित्रपटवाल्यांना खोटे बोलण्याची आणि गैरव्यवहार करण्याची वाईट सवय आहे. त्यामुळे त्यांना बौद्धिक संपदा हक्क शिकवण्यासाठी मी अॅड सत्य सभरवाल यांच्यामार्फत चित्रपट अभिनेता अक्षय कुमार (भाटिया) आणि इतर ८ जणांना कायदेशीर नोटीस बजावली आहे’. कथेचा विपर्यास केला आहे असा आरोप त्यांनी केला आहे

‘राम सेतू’ हा चित्रपट एक अॅक्शन-अ‍ॅडव्हेंचर ड्रामा आहे. याचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे आणि अक्षयची कंपनी केप ऑफ गुड फिल्म्स सोबत इतर कंपन्यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. यात अक्षय कुमार, जॅकलीन फर्नांडिस, नुश्रत भरुचा आणि सत्य देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि या वर्षी २४ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे.