गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांना उतरती कळा लागली आहे. बॉलिवूडमधील मोठमोठ्या कलाकारांचे चित्रपट एकामागून एक फ्लॉप होताना दिसत आहे. एकेकाळी सुपरहिट चित्रपट देणारे हिंदी चित्रपटसृष्टी आता मात्र सुपर फ्लॉप ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई करणारे चित्रपट आता मात्र चित्रपटगृहात कधी प्रदर्शित होतात आणि कधी पडतात हेच समजत नाही. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड व्हायरल होत आहे. यावर विविध प्रतिक्रिया समोर येत असतानाचा आता भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते यांनी बॉलिवूड आणि त्यांच्या सुपरस्टार्सला याबाबत सल्ला दिला आहे.
विश्लेषण : बॉलिवूड चित्रपट एकामागून एक फ्लॉप होण्यामागची कारण काय? जाणून घ्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे २०२० मध्ये निधन झाले होते. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीवर बहिष्कार घालण्याची मागणी सुरू झाली. यानंतर कंगना रणौतने सर्वप्रथम बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका केली. तसेच हिंदी चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणीही तिने केली होती. बॉलिवूडचे एकामागून एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होऊ लागले. आता भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सय्यद जफर इस्लाम यांनी ट्वीट करत यावर प्रतिक्रिया दिली.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सय्यद जफर इस्लाम यांनी मंगळवारी एक ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणाले, “बॉलिवूड कलाकारांचे इतके चित्रपट एकामागून एक फ्लॉप होत आहेत. मात्र अजूनही त्यांना ग्राउंड रिअॅलिटी समजलेली नाही. जर बॉलिवूड कलाकारांनी योग्य मानधन घेतले तर निर्मातेही देशाच्या हितासाठी असणारे चांगले चित्रपट बनवण्यावर भर देऊ शकतील. तसेच हल्ली लोकांसाठी OTT हा एक चांगला आणि स्वस्त पर्याय उपलब्ध झाला आहे, हे त्यांनी विसरु नये.” हे ट्वीट करताना त्यांनी सलमान खान, अक्षय कुमार आणि शाहरुख खान यांनाही टॅग केले आहे.

बॉलिवूडमधील अनेक चित्रपट एकामागून एक फ्लॉप होताना दिसत आहेत. करोनानंतर चित्रपटगृह सुरु झाल्यानंतर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. यातील ‘सूर्यवंशी’, ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटांशिवाय अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘रक्षा बंधन’ हे चित्रपट वाईटरित्या फ्लॉप ठरले.

विश्लेषण : रस्ते अपघाताला कारणीभूत ठरणारे हायवे हिप्नोसिस नेमके आहे तरी काय? त्यात काय घडतं?

त्यासोबतच रणबीर कपूरचा ‘शमशेरा’, ‘एक व्हिलन रिटर्न्स’, आर माधवनचा ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’, आयुष्मान खुरानाचा ‘माणिक’, हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असलेला ‘रनवे 34’ किंवा अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’, अगदी कंगना रणौतचा ‘धाकड’ हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकामागून एक आपटले. यातील अनेक चित्रपट हे सुपरहिट होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र तरीही या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारच थोडी थोडकी कमाई केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leader syed zafar islam suggests bollywood stars to charge reasonable fee nrp
First published on: 17-08-2022 at 11:21 IST