भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जाहीर झालेला पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित केलेल्या ८० व्या मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृतिदिन सोहळ्यात या पुरस्काराने पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. कार्यक्रमाला सर्व मंगेशकर कुटुंबियांबरोबरच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचं नाव आमंत्रण पत्रिकेवर नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच रंगली. याच मुद्द्यावरुन राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट मंगेशकर कुटुंबियांवर निशाणा साधला. मंगेशकर कुटुंबियांनी महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचा अपमान केल्याचा दावा करत आव्हाड यांनी मंगेशकर कुटुंबियांवर टीका केली. या टीकेला आता भाजपाने उत्तर दिलंय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: मोदी भावूक होऊ म्हणाले, “लतादीदी मोठ्या बहिणीसारख्या, त्यांनी गाण्यांमधून छत्रपती शिवाजी महाराज…”

प्रकरण काय?
माटुंग्यातील षण्मुखानंद सभागृहामध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले. परंतु पंतप्रधानांचे विमानतळावर स्वागत करण्याकरिता राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेते पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित होते. हा कार्यक्रम खासगी होता. त्यामुळे आमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख नव्हता, असं सांगण्यात आलं. मंगेशकर कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केल्याचं सांगण्यात येत होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आव्हाड काय म्हणाले?
आव्हाड यांनी ट्विटरवरुन केलेल्या एका पोस्टमध्ये ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार सोहळ्याची निमंत्रण पत्रिका शेअर केली आहे. ही पत्रिका शेअर करत त्यांनी थेट मंगेशकर कुटुंबियांवर टीका केलीय. “लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले.त्यांची ही भूमिका अगम्य आहे. या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे,” असं आव्हाड म्हणालेत.

भाजपाने साधला निशाणा
शिवसेनेनं आज ‘सामना’मधून केलेली टीका आणि आव्हाडांच्या या वक्तव्यावरुन भाजपाचे मुख्य प्रवक्ते भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली असून त्यात थेट आव्हाड यांचा उल्लेख टाळत ‘महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचा मंगेशकर कुटुंबियांनी अपमान केला’ या आरोपावरुन टोला लगावलाय. “सत्तेसाठी आंधळे झालेले काही महाभाग नेते आता स्वत:च्या स्वार्थासाठी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांवरही आरोप करत आहेत. मंगेशकर कुटुंबीयांनी १२ कोटी जनतेचा अपमान केला म्हणे, अहो, मग नवाब मलिक, अनिल देशमुख, सचिन वाझे या तुमच्या म्होरक्यांनी अभिमानास्पद कामगिरी केलीय का? माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी भाजपाविरोधात वाटेल ते बोलत राहणं ही सवय मुलुंडपासून मुंब्रापर्यंत नेत्यांना जडलीय,” असं केशव उपाध्ये म्हणालेत.

दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवडीमधील शिंदे आजींच्या भेटीला गेले होते. मातोश्रीबाहेर राणा दांपत्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये शिंदे आजीही सहभागी झाल्या होत्या. त्याचा झुकेगा नही हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री पत्नी रश्मी ठाकरे आणि दोन्ही मुलांसोबत शिंदे यांच्या घरी पोहोचले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp slams jitendra awhad for saying mangeshkar family insulted 12 crore people of maharashtra scsg
First published on: 25-04-2022 at 12:37 IST