अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

लग्नानंतरही त्याचं नाव काही अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं

akshay, priyanka, twinkle
अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, ट्विंकल खन्ना

बॉलिवूडमध्ये कोणत्याही कलाकाराच्या वाट्याला यश येऊ लागल्यावर त्या कलाकाराच्या खासगी आयुष्याविषयीसुद्धा बऱ्याच चर्चा रंगू लागतात. अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता अक्षय कुमार. खिलाडी कुमार या नावाने ओळखला जाणारा अक्षय अनेकांचाच आवडता अभिनेता आहे. स्वत:च्या अभिनयाच्या बळावर, कोणाचाही वरदहस्त नसतानाही या कलाविश्वात त्याने नाव कमावलं आणि स्वत:चं स्थान निर्माण केलं. पण, प्रसिद्धी आणि यश यासोबतच अक्षय चर्चेत आला तो म्हणजे त्याच्या प्रेमप्रकरणांमुळे.

सध्याच्या घडीला हा खिलाडी ‘परफेक्ट फॅमिली मॅन’ झाला असला तरीही एकेकाळी त्याचं नाव पूजा बत्रा, आएशा झुल्का, रवीना टंडन, रेखा, शिल्पा शेट्टी आणि प्रियांका चोप्रा या अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. ट्विंकलसोबत विवाहबंधनात अडकण्यापूर्वी अक्षय बरीच वर्षे शिल्पा शेट्टीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण, त्यानंतर मात्र त्याने ट्विंकलशी लग्न करत सर्वांनाच धक्का दिला. लग्नानंतरही त्याचं नाव काही अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा.

वाचा : गोष्ट पहिल्या सुपरस्टारच्या पहिल्या प्रेयसीची…

२००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंदाज’ या चित्रपटात अक्षय आणि प्रियांकाने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटातील ‘आएगा मजा अब बरसात का’, या गाण्यात त्या दोघांचीही केमिस्ट्री पाहण्याची संधी मिळाली होती. या चित्रपटानंतर अक्षय- प्रियांका ही जोडी आणखी चित्रपटांमध्येही झळकली. त्यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसोबतच ऑफस्क्रीन नात्याच्याही चर्चांनी जोर धरला होता. ‘ऐतराज’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘वक्त- द रेस अगेन्स्ट टाइम’ या चित्रपटांमधून स्क्रीन शेअर करणारे खिलाडी कुमार आणि प्रियांका रिलेशनमध्ये असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. या सर्व चर्चा ट्विंकलपर्यंत पोहोचल्या तेव्हा मात्र तिची तळपायाची आग मस्तकात गेली. इतकंच नव्हे, तर तिने अक्षयला प्रियांकापासून दूर राहण्याची ताकिदही दिली.

वाचा : रवीनाने अक्षय कुमारला ‘या’ अभिनेत्रींसोबत पकडलं होतं…

ताकिद देऊनही अक्षय आपल्या बोलण्याचा गांभीर्याने विचार करत नाहीये हे लक्षात येताच ट्विंकलने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला होता असंही म्हटलं जातं. त्यानंतरच्या काळात अक्षयने कशीबशी तिची मनधरणी केली. अक्षयसोबतच ट्विंकलने प्रियांकालाही याप्रकरणी खडसावलं असल्याचं म्हटलं जातं. प्रियांकावर ट्विंकलचा इतका राग होता की तिला समज देण्यासाठी ती थेट ‘वक्त- द रेस अगेन्स्ट टाइम’ या चित्रपटाच्या सेटवरही पोहोचल्याचं म्हटलं जातंय. अक्षय आणि प्रियांका बहुचर्चित प्रेमप्रकरणामुळे खिलाडी कुमारच्या वैवाहिक आयुष्यात बरीच वादळं आली होती हेच यावरुन स्पष्ट होतंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bollywood actor akshay kumar love affair with desi girl priyanka chopra on andaaz set wife twinkle khanna got angry