फोटोतील ‘या’ चिमुकल्याला ओळखलं का? ‘मिर्झापूर’मध्ये साकारलीये जबरदस्त भूमिका

तुम्ही ओळखलं का ‘या’ अभिनेत्याला?

चाहते आणि सेलिब्रिटी यांना एकमेकांना जोडी ठेवणारा उत्तम मार्ग म्हणजे सोशल मीडिया. अनेक सेलिब्रिटी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी इन्स्टाग्राम, ट्विटर या माध्यमांचा वापर करतात. कधी लाइव्ह येऊन ते थेट संवाद साधतात. तर कधी फोटो, व्हिडीओ शेअर करुन त्यांच्या जीवनातील अपडेट्स देतात. यात अनेकदा काही सेलिब्रिटी त्यांच्या कुटुंबाचे किंवा बालपणीचे फोटोदेखील शेअर करतात. यात सध्या मिर्झापूरमधील एका अभिनेत्याचा फोटो चर्चेत आला आहे.

अॅमेझॉन प्राइमवरील ‘मिर्झापूर’ आणि ‘मिर्झापूर 2’ या दोन्ही वेब सीरिज सध्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आहेत. या सीरिजमधील कालीन भैय्या, गुड्डू, बबलू आणि मुन्ना भैय्या हे पात्र सध्या चाहत्यामध्ये लोकप्रिय झाल्याचं दिसून येत आहे. त्यातच सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती यातील एका कलाकाराच्या बालपणीच्या फोटोविषयी.

‘मिर्झापूर’मध्ये गुड्डू भैय्या ही भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे अली फजल. तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या अलीने इन्स्टाग्रामवर त्याचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंपैकी त्याचे बालपणीचे फोटो अनेकदा चर्चेत आल्याचं दिसून येतं. सध्या सोशल मीडियावर अलीच्या असाच एक लहानपणीचा फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे त्याचा हा फोटो पाहिल्यानंतर त्याला ओळखणंही कठीण आहे.

आणखी वाचा- कालीन भैय्या ते गुड्डू पंडित.. खऱ्या आयुष्यात इतक्या संपत्तीचे मालक आहेत Mirzapur 2 चे कलाकार

दरम्यान, अली सध्या अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत झाला आहे. त्यातच मिर्झापूर या वेब सीरिजमुळे त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bollywood actor ali fazal share childhood photo ssj

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या