चित्रपटांमध्ये खलनायकी भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आशिष विद्यार्थी यांची चित्रपट कारकिर्द तशी अनेकांचं लक्ष वेधेल अशीच आहे. आजवर त्यांनी साकारालेल्या विविध भूमिकांना पडद्यावर बऱ्याचदा मरण आलं आहे. बसला ना तुम्हालाही धक्का? खलनायकी भूमिकेला ताकदीने पडद्यावर साकाराणाऱ्या या अभिनेत्यावर अशाच एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान असाच एक प्रसंग ओढवला होता. ज्यावेळी पाण्यात बुडतानाच्या दृश्याचं चित्रीकरण करतेवेळी ते खरच बुडत होते. उपस्थितांना तो चित्रकरणाचाच भाग आहे असं वाटलं आणि याच कारणांमुळे त्यांच्या मदतीला कोणीही धावून आलं नाही.

छत्तीसगढमधील महमरा एनीकट या ठिकाणी ‘बॉलिवूड डायरीज’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असताना ती घटना घडली होती. दृश्यासाठी ठरल्याप्रमाणे विद्यार्थी यांना पाण्यात उतरायचं होतं. पण, त्यादरम्यान ते जास्त खोल पाण्यात गेले आणि काही कळण्याआधीच ते पाण्यात बुडत होते. त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थितांना हे चित्रपटातीलच एखादे दृश्य आहे असं वाटलं आणि कोणीही त्यांना मदतीचा हात दिला नाही. त्यावेळी एका पोलिस अधिकाऱ्याने मोठ्या धैर्याने पाण्यात उडी मारून आशिष विद्यार्थी यांचे प्राण वाचवले होते. तो प्रसंग पाहता आशिष विद्यार्थी मोठ्या संकटातून परतले होते अशीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली होती.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
girish mahajan manoj jarange
“मनोज जरांगेंना माफी नाही, त्यांनी आता…”, गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”
ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”

VIDEO : ‘मन्नत’बाहेर सलमान शाहरुखला आवाज देतो तेव्हा…

रंगभूमीवर आपल्या अभिनय कलेला नवी उभारी देणाऱ्या या अभिनेत्याला खरी ओळख मिळाली ती म्हणजे, ‘हम पंछी एक चाल के’ या मालिकेतून. दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच आशिष विद्यार्थी यांनी हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री शकुंतला बरुआ यांच्या मुलीसोबत म्हणजेच अभिनेत्री राजोशी बरुआ यांच्यासोबत विद्यार्थी यांनी संसार थाटला. राजोशीसुद्धा अभिनय क्षेत्रात सक्रिय असून स्टार वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘सुहानी सी एक लडकी’ या मालिकेतील भूमिकेमुळे त्या चर्चेत आल्या होत्या. दरम्यान, आशिष विद्यार्थी यांनी ‘बेगम जान’ या चित्रपटामध्ये साकारलेल्या भूमिकांनाही प्रेक्षकांनी दाद दिली होती. प्रभावी अभिनय सादर करणारा हा अभिनेता आजही त्याच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.