बोमन इराणी बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक, हिंदीमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये बोमन यांनी काम केलं आहे. तसेच त्यांनी साकारलेल्या प्रत्येक भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातून त्याने पदार्पण केलं. वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी आजवर केल्या आहेत. आपल्या अभिनयाची जादू त्यांनी दाखवली आहे. मात्र चाहत्यांसाठी त्यांनी काही सल्ल्ले दिले आहे. आपल्याकडे ‘लग्न’ हा विषय माणसाच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा टप्पा मानला जातो. सध्या घटस्फोटाचे प्रमाण वाढत चालले आहे, म्हणूनच लग्न टिकून राहावे यासाठी बोमन इराणी यांनी काही सल्ले दिले आहेत.

‘कर्ली टेल्स’ या कार्यक्रमात हे पाहुणे म्हणून आले होते, तेव्हा कार्यक्रमाची निवेदिका कामिया जानी हिने बोमन इराणी यांना प्रश्न विचारला की, ‘चाहत्यांना लग्नसंबंध टिकून राहावेत यासाठी काय सल्ला द्याल? तुमच्या लग्नाला बरीच वर्ष झाली आहेत’. यावर बोमन इराणी म्हणाले, ‘कोणतेही भांडण दुसऱ्या दिवशी काढू नका आदल्या रात्री संपवून टाका, ज्याची चूक आहे त्याने काबुल करा तुम्हाला वाद वाढून बक्षीस मिळणार नाही. मी पण म्हणतोय ते खरं हा ठेका घेऊ नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादा विनोद करून हे भांडण संपवून टाका’. आपल्या चाहते, प्रेक्षकांसाठी बोमन यांनी हे दोन सल्ले दिले आहेत.

Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

“मी सलमानची एक झलक… ” दाक्षिणात्य अभिनेता दुलकिरने सांगितला ‘तो’ किस्सा

काही वर्षात लग्नसंस्था टिकेल का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. करियरची वाढती स्पर्धा, कामाचे तास, यामुळे आपल्या जोडीदारकडे दुर्लक्ष होताना अनेक जोडप्यांमध्ये दिसून आले आहे. प्रेमविवाह करूनदेखील अवघ्या काही महिन्यात घटस्फोट घेतलेले काही जोडपे आहेत. बोमन इराणीप्रमाणे इतर बॉलिवूड सेलिब्रेटी नातेसंबंधावर भाष्य करताना दिसून येत असतात.

बोमन इराणी अभिनयात येण्यापूर्वी अनेक ठिकाणी काम करत होते. सुरवातीला त्यांनी ताज हॉटेलात काम केलं आहे. त्यानंतर काही वर्षे बेकारी व्यवसाय सांभाळला आहे. फोटाग्राफर म्हणून काही वर्ष काम केलं आहे. अभिनयाचा श्रीगणेशा त्यांनी नाटकांपासून केला आहे. मराठी अभिनेते सुधीर जोशी यांच्याशी त्यांचे घरचे संबंध होते.