वयाच्या ५७ व्या वर्षीही तोच उत्साह; बर्थ डे पार्टीमध्ये गोविंदाच्या डान्सचा अफलातून अंदाज

पत्नीसोबत गोविंदाने धरला ताल; पाहा त्यांच्या डान्सचा भन्नाट व्हिडीओ

प्रसिद्ध अभिनेता गोविंदा आणि त्याची डान्स स्टाइल ही आजही तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. कोणत्याही गाण्यावर आपल्याच अंदाजात ताल धरत मनमुरादपणे डान्स करण्याची त्याची स्टाइल अनेकांना वेड लावून जाते. त्यामुळे आजही त्याच्यावर चित्रित झालेली गाणी प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली आहेत. अलिकडेच गोविंदाने त्याचा ५७ वा वाढदिवस सेलिब्रेट केला. विशेष म्हणजे या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये पुन्हा एकदा गोविंदाचा डान्सची झलक पाहायला मिळाली. मात्र, यावेळी त्याच्यासोबत त्याच्या पत्नीनेदेखील ताल धरला.

‘विरल भयानी’ यांच्या इन्स्टाग्राम पेजवर गोविंदाच्या बर्थ डे पार्टीचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये गोविंदाने ‘हीरो नंबर 1’, ‘कुली नंबर 1’ या चित्रपटांमधील गाण्यांवर ताल धरला आणि यात त्याला साथ मिळाली ती त्याच्या पत्नीची. सध्या गोविंदा आणि त्याच्या पत्नीचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला असून व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, गोविंदाने आयोजित केलेल्या पार्टीमध्ये कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता शक्ती कपूर, नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनीदेखील त्यांच्या स्टाइलमध्ये डान्स केला. गोविंदा हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता असून त्याचे ‘राजा बाबू’, ‘दुल्हे राजा’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘कुली नंबर 1’, ‘हीरो नंबर 1’, ‘हसीना मान जाएगी’ हे चित्रपट तुफान गाजले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bollywood actor govinda dance with his wife on his birthday party ssj

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे
ताज्या बातम्या