scorecardresearch

बहिणीचं उदाहरण देत हृतिक म्हणतो, कोणतीही गोष्ट अशक्य नसते

दीदी तुझा मला फार अभिमान वाटतो.

बहिणीचं उदाहरण देत हृतिक म्हणतो, कोणतीही गोष्ट अशक्य नसते
छाया सौजन्य- ट्विटर

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि मग कालांतराने त्याच गोष्टी अशक्य वाटू लागतात. पण, असं नेमकं का होतं? या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नसावं. पण, तरीही त्या उत्तराच्या जवळ जाणारी एक वाट अभिनेता हृतिक रोशनने सर्वांनाच दाखवलीये. हृतिकने त्याच्या बहिणीचा म्हणजेच सुनैना रोशनचा एक फोटो ट्विट केला आहे. यासोबत त्याने साजेसं कॅप्शनही दिलंय. या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ‘कोणतीही गोष्ट अशक्य नसते. बदल म्हणजे नेमकं काय याची प्रचिती मला आली आहे. दीदी तुझा मला फार अभिमान वाटतो.’

हृतिकने दोन फोटो एकत्र करत त्याचा कोलाज केला आहे. ज्यामध्ये सुनैना एका बाजूला बरीच स्थूल दिसत असून, दुसऱ्याच बाजूला तिचा स्लीम लूक पाहायला मिळतोय. सुनैनाचं वजन लहापणापासूनच जास्त होतं. त्यातही गेल्या काही वर्षांमध्ये ती आणखीनच स्थूल झाली होती. पण, तिने आपल्या फिटनेसकडे सर्वतोपरी लक्ष देऊन वजन कमी केलं. तिच्या याच निर्णयाला आणि चिकाटीला सलाम करण्यासाठी हृतिकने हा फोटो पोस्ट केला आहे.

वाचा : जाणून घ्या, चित्रपटातील डिझायनर कपड्यांचं पुढे करतात तरी काय?

हा फोटो शेअर करण्यामागे आणखी एक कारण असल्याची शक्यता ‘बॉलिवूड लाइफ’ या वेबसाइटने वर्तवली आहे. फिटनेसप्रती हृतिकची असणारी ओढ सर्वांनाच ठाऊक आहे. याच धर्तीवर त्याने ‘एचआरएक्स वर्कआऊट’ सर्वांसमोर आणलं होतं. यासाठी त्याने प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर मुस्तफा अहमदची मदतही घेतली होती. आपण डिझाईन केलेलं फिटनेस रिजिम एका वेगळ्या मार्गाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच त्याने सुनैनाचा फोटो पोस्ट केल्याचं म्हटलं जातंय.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-09-2017 at 13:26 IST

संबंधित बातम्या