रणबीर कपूर आणि कतरिना कैफ या दोघांनीही त्यांच्या रलेशनशिपला पूर्णविराम द्यायचं ठरवलं आणि त्यांच्या या निर्णयाचा परिणाम आगामी चित्रपटावर झाला. अनुराग बासू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या चित्रीकरणावर रणबीर- कॅटच्या ब्रेकअपचा परिणाम झाला. पण, सरतेशेवटी या दोन्ही कलाकारांनी दिलेल्या शब्दाखातर या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं. अशा या बहुप्रतिक्षित चित्रपटाचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. मोरक्कोमध्ये या गाण्याचं चित्रीकरण करण्यात आल्याचं पाहताक्षणी लक्षात येतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोरक्कोमधील पार्श्वभूमीच्या बळावर प्रदर्शित झालेलं ‘उल्लू का पठ्ठा’ हे गाणं येत्या काळात अनेकांच्या प्लेलिस्टचा भाग होईल असं म्हणायला हरकत नाही. अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी गायलेल्या या गाण्याची चालही अगदी सुरेख आहे. मुख्य म्हणजे रणबीर- कतरिनाने या गाण्यावर धरलेला ठेका पाहण्याजोगा आहे. अमिताभ भट्टाचार्यच्या लेखणीतून साकारलेल्या या गाण्यातून रणबीर- कतरिनाची केमिस्ट्रीही सुरेख आहे.

मुख्य म्हणजे या गाण्यात बॉलिवूडच्या या दोन आघाडीच्या कलाकारांपैकी इतरही पाहुणे कलाकार पाहण्याची संधी मिळत आहे. हे कलाकार म्हणजे विविध प्राणी. ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही बऱ्याच प्राण्यांची झलक पाहायला मिळालेली. आता ‘उल्लू का पठ्ठा’ या गाण्यातही जिराफ, झेब्रा, ऑस्ट्रीच, शेळ्या हे प्राणी पाहायला मिळत आहेत. या गाण्यामधील दृश्य आणि रणबीर- कॅटच्या चेहऱ्यावरील भाव पाहता चित्रपटाच्या कथानकाविषयी फार काही अंदाज लावता येत नाहीये. पण, गाण्याच्या सुरुवातीलाच आमिरच्या ‘हम है राही प्यारके’ या चित्रपटातील ‘बम्बई से गई पुना…’ या गाण्याची आठवण होत आहे. या गाण्यातील सुरुवातीप्रमाणे ‘उल्लू का पठ्ठा’चीही सुरुवात करण्यात आल्यामुळे हा निव्वळ योगायोगाचा भागच म्हणावा लागेल. दरम्यान, ‘जग्गा जासूस’मधून रणबीरच्या भूमिकेतून एक वेगळ्याच रुपातील निरागस हेर पाहायला मिळणार आहे. १४ जुलै रोजी रणबीर- कतरिनाच्या रुपात बॉलिवूडचे हे क्यूट हेर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

वाचा: … या अभिनेत्यांचं नक्की वय तरी काय?

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor ranbir kapoor and actress katrina kaif starer jagga jasoos song ullu ka pattha
First published on: 02-06-2017 at 15:33 IST