‘या अभिनेत्री कोण?’, श्रीदेवी यांना ओळखू शकले नाही ऋषी कपूर

नेमकं ऋषी कपूर, श्रीदेवी यांना कसे ओळखू शकले नाहीत हे जाणूनच अनेकांना धक्का बसत आहे.

sridevi
श्रीदेवी, sridevi

अनेकदा आपल्या सोशल मीडिया पोस्टसाठी चर्चेत येणाऱ्या अभिवेता ऋषी कपूर यां नी पुन्हा एकदा सर्वांचच लक्ष वेधलं आहे. मुळात त्यांची एक चूक सध्या चांगलीच महागात पडल असल्याचं पाहायला मिळत आहे. कपूर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटलवरुन शेअर केलेली जीआयएफ व्हिडिओ यामागचं मुख्य कारण ठरत आहे.

आपल्या चित्रपटांच्या आणि कलाकार मंडळींच्या बाबतीत नेहमीच प्रमाणापेक्षा जास्त सतर्क असणारे ऋषी कपूर नेमके यावेळी चुकले कसे असा प्रश्नही अनेकांच्या मनात घर करत आहे. कारण, त्यांनीच शेअर केलेल्या जीआयएफमधील अभिनेत्री श्रीदेवी यांना ते ओळखूच शकलेले नाहीत. मुख्य म्हणजे त्यांना इथे चित्रपटाचं नावही ओळखता आलेलं नाही. ‘हा नेमका कोणता चित्रपट आहे, माझ्यासोबतच्या या अभिनेत्री कोण आहेत?’, असा प्रश्न त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला.

वाचा : मानधन न स्विकारताही आमिर असा कमावतो बक्कळ नफा

‘कौन सच्चा कौन झुठा’, या चित्रपटातीलच तो व्हिडिओ असून, नेमकं ऋषी कपूर, श्रीदेवी यांना कसे ओळखू शकले नाहीत हे जाणूनच अनेकांना धक्का बसत आहे. या चुकीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांना चांगलच धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा आता ही चूक सुधारण्यासाठी ‘चिंटूभैय्या’ नेमकं काही स्पष्टीकरण देणार का, हे पाहणं मह्त्वाचं ठरणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bollywood actor rishi kapoor gets trolled as he couldnt recognize actress sridevi and his film in this picture

ताज्या बातम्या