“समोर बंदूक ठेवून चित्रपट साइन करायला लावला होता”, रोहित रॉयने सांगितला थरारक अनुभव

रोहित रॉयने शेअर केला सुरुवातीच्या दिवसांतील अनुभव

करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन आता शिथील केला जात असून अभिनेतेदेखील पुन्हा एकदा शुटिंगला सुरुवात करत आहेत. अभिनेता रोहित रॉयदेखील आपल्या आगामी चित्रपटासाठी सध्या तयारी करत आहे. एका मुलाखतीत बोलताना रोहित रॉयने जॉन अब्राहमसोबत काम करण्याचा अनुभव शेअऱ केला. तसंच सुरुवातीच्या दिवसांमध्ये कशा पद्धतीने बंदुकीचा धाक दाखवत चित्रपट साइन करायला लावला होता याबद्दलही सांगितलं आहे.

“यावेळी मी एका गुडांची भूमिका निभावत आहे. चित्रपटात माझं वजन ८० किलोच्या आसपास असल्याने ते कायम ठेवण्यासाठी मला बरीच मेहनत घ्यावी लागली,” असं रोहित रॉय सांगतो. जॉनसोबत काम करण्याचा आपला अनुभव खूप उत्तम असल्याचंही रोहित रॉयने सांगितलं आहे. त्याच्याकडे चांगली विनोदबुद्धी असल्याचं रोहित रॉयने म्हटलं आहे. सीन शूट झाला की जॉन नेहमी अरे यात तर रोहितचीच बॉडी दिसत आहे असा मस्करी करायचा असं रोहित सांगतो.

‘काबिल’मध्ये ह्रतिकसोबत काम केल्यानंतर त्याच्यासारखा दुसरा अभिनेता मिळेल का याबाबत मला शंका होती. पण जॉन आणि ह्रतिक दोघांचाही स्वभाव सारखा असल्याचं रोहित सांगतो. रोहितने यावेळी आपल्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये अंडरवर्ल्डशी कशा पद्धतीने सामना झाला होता याबद्दलही सांगितलं आहे.

“मला एका चित्रपटाची कथा ऐकवण्यासाठी बोलवलं होतं. त्यावेली टेबलवर माझ्या दिशेने बंदूक ठेवण्यात आली होती. त्यावेळी होकार देण्याशिवाय माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता. पण सुदैवाने तो चित्रपट तयार झालाचा नाही,” असं रोहितने सांगितलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bollywood actor rohit roy on his brush with the underworld sgy

ताज्या बातम्या