बॉलिवूडचा किंग शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटामध्ये तो अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या या चित्रपटाचं नाव आणि पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. किंग खानचा कोणताही चित्रपट म्हटल्यावर प्रेक्षकांमध्येही त्या चित्रपटाविषयी बरंच कुतूहल पाहायला मिळतं. त्यात शाहरुखच्या आगामी चित्रपटाचं नाव पाहता चित्रपटाचं कथानक नेमकं कसं असणार याविषयीसुद्धा अंदाज बांधण्यात येत आहे.

‘जब हॅरी मेट सेजल’ असं नाव असलेल्या या चित्रपटातून इम्तियाज अली पुन्हा एकदा प्रेमाची नवी परिभाषा प्रेक्षकांसमोर मांडणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान, किंग खानच्या या चित्रपटाचं पोस्टर फार कलात्मक असलं तरीही सोशल मीडियावर मात्र या पोस्टरमध्ये अनेकांनीच त्यांची कलात्मकता पाहायला मिळत आहे. विनोदी मालिका आणि चित्रपटांचा आधार घेत सध्या सोशल मीडियावर बरेच मिम व्हारल होत आहेत. यामध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील ‘दयाबेन-जेठालाल’ आणि ‘बाहुबली’ या चित्रपटावर आधारितही मिम तयार करण्यात आले आहेत.

VIDEO : तिला ‘आय लव्ह यू’ म्हणताच कतरिनाने रणबीरला लगावली चपराक

तसं पाहिलं तर विविध चित्रपट दिग्दर्शकांसोबत काम करणाऱ्या शाहरुखचा इम्तियाज अलीसोबतचा हा पहिला प्रोजेक्ट आहे. त्यामुळे किंग खान आणि अनुष्काच्या केमिस्ट्रीला इम्तियाजच्या दिग्दर्शनाची जोड मिळाल्यामुळे हा चित्रपट अनेकदृष्ट्या महत्त्वाचा ठरत आहे. तूर्तास कलात्मकतेला वाव देत सोशल मीडियावर चर्चेत असणारे हे मिम पाहता कोणाचं डोकं कधी आणि कुठे चालेल याचा काही नेम नसल्याचं स्पष्ट होत आहे. हे आहेत त्यापैकीच काही बहुचर्चित मिम…

whatsapp-image-20

whatsapp-image

whatsapp-image-1

whatsapp-image-2

whatsapp-image-3

whatsapp-image-4

whatsapp-image-5

whatsapp-image-7