scorecardresearch

‘ब्रह्मास्त्र’ मधला किंग खानचा लूक व्हायरल, चाहते म्हणाले, “२० मिनिटांच्या भूमिकेत शाहरुखने.. “

‘ब्रह्मास्त्र’ हा या वर्षातील सर्वात मोठा प्रदर्शित झालेला चित्रपट मानला जात आहे.

‘ब्रह्मास्त्र’ मधला किंग खानचा लूक व्हायरल, चाहते म्हणाले, “२० मिनिटांच्या भूमिकेत शाहरुखने.. “
शाहरुख खान | shahrukh khan

आलिया आणि रणबीरचा ‘ब्रह्मास्त्र’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. सोशल मीडियावर एकीकडे बॉयकॉट ब्रह्मास्त्र हा ट्रेंड सुरू आहे तर एकीकडे ब्रह्मास्त्र पाहायला लोकांची गर्दीदेखील दिसत आहे. बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, ‘ब्रह्मास्त्र’ने दुसऱ्या दिवशी ४१.२५ ते ४३.१५ कोटी कमावले आहेत. यासह, देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सर्व भाषांमध्ये ७९ कोटींची कमाई केली आहे. शनिवारी केवळ हिंदी व्हर्जनने ३७.५०कोटींचा व्यवसाय केला. ‘ब्रह्मास्त्र’ने हिंदीत दोन दिवसांत जवळपास ६९.५० कोटींची कमाई केली आहे.

चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबरीने किंग खान अर्थात शाहरुख खानदेखील या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसत आहे. या चित्रपटात शाहरुख खानने मोहन भार्गव नावाच्या शास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात शाहरुख खानला पाहायला गेलेले अनेक चाहते आहेत. शाहरुखच्या चाहत्यांनी त्याचे चित्रपटातील फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की शाहरुख खानने त्याच्या २० मिनिटांच्या भूमिकेत उत्तम कामगिरी केली आहे. त्याचा अभिनय आणि त्याचा दर्जा चित्रपटात पाहण्यासारखा आहे.

‘ब्रह्मास्त्र’चे शोज आता ‘या’ वेळेतही? प्रेक्षकांच्या मागणीला जोर

हा चित्रपट येत्या ३ दिवसात १०० कोटी हा आकडा पार करेल असं म्हंटलं जात आहे. येत्या सोमवारपर्यंत या आकड्यांमध्ये आणखीन वाढ होऊ शकेल. हृतिक रोशन आणि सैफ अली खानचा ‘विक्रम वेधा’ ३० सप्टेंबरला प्रदर्शित होणार असल्यामुळे ‘ब्रह्मास्त्र’कडे रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी तसा बराच कालावधी आहे. सोशल मीडियावर पुन्हा बॉयकॉट ट्रेंड जोर धरू लागल्याने या कमाईच्या आकड्यावर परिणाम होऊ शकतो असंही म्हंटलं जात आहे.

‘ब्रह्मास्त्र’ हा या वर्षातील सर्वात मोठा प्रदर्शित झालेला चित्रपट मानला जात आहे. चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘ब्रह्मास्त्र’चा पहिला भाग ‘शिवा’ प्रदर्शित झाला आहे. यानंतर चित्रपटाचे आणखी दोन भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bollywood actor shahrukh khan cameo brahmastra leaked fans appreciating the role spg