मीरा राजपूतचे ‘हे’ टॅलेंट पाहून शाहिद कपूर झाला फिदा ; व्हिडीओ व्हायरल

मीरा राजपूत सोशल मीडियावर सक्रिय असते

mira-rajput
(Photo-Instagram)

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर ची पत्नी मीरा राजपूत ही सोशल मीडियावर सक्रिय असते. ती अनेकदा थ्रोबॅक व्हिडीओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते. मीरा राजपूत अभिनय क्षेत्रातपासून लांब असली तरी तिच्याकडे अनेक असे कलागुण आहेत जे बऱ्याच फॅन्स ना ठाऊक नाहीत. दोन मुलांची आई असलेल्या मीराने एक व्हिडीओ शेअर करत तिच्या अनेक कलागुणांपैकी एका सुप्त गुण चाहत्यांसोबत शेअर केलाय.

मीराने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पियानो वाजवतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की ती एक प्रशिक्षित पियानो वादक आहे. व्हिडीओमध्ये तिने मास्क घातला असल्याचे पहायला मिळत आहे. तसंच मीरा पियानो वाजवताना पती शाहिद कपूर तिथेच एका कोपऱ्यात थांबला असल्याचे पहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये काही कॅप्शन देखील पाहायला मिळत आहे. “तुम्हाला मी पियानो वाजवते हे माहिती आहे का? बरं, मी याच्या ३ परीक्षा देखील दिल्या आहेत. मी ३ वर्षांची असल्यापासून गाणं ऐकल्यावर लगेच वाजवू शकते आणि मला असं वाटत की मी पुन्हा याचे धडे घायला सुरू करणार आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor)

तसंच मीराने व्हिडीओमध्ये शाहिद कपूर उपस्थित असल्याचे सांगितले आहे. ती या पोस्टमध्ये पुढे लिहिते, ” मी बेखयाली हे गाणं वाजवेपर्यंत त्याने वाट पाहिली.” ‘बेखयाली’ हे शाहिदच्या ‘कबीर सिंग’या चित्रपटातील लोकप्रिय गाणं आहे. मीराने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी मीराने तिच्या इन्स्टाग्रामवर लहानपणी पियानो वाजवतानाचा फोटो शेअर केला होता.  मीराचे हे टॅलेंट पाहुन नेटकरी खूप आनंदित झाले आहेत. तिच्या या पोस्टवर कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. तिच्या या नवीन व्हिडीओ पाहुन नेटकरी फिदा झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bollywood actor shaid kapoor wife mira rajput shares video of her hidden talent aad

ताज्या बातम्या