अक्षय कुमारसोबत काम करणाऱ्या ‘या’ कलाकाराला तुम्ही ओळखलत का?

‘लक्ष्मी बॉम्ब’ आणि ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ सारख्या लोकप्रिय चित्रपटात हा नट प्रमुख भूमिकेत झळकला आहे.

sharad-kelkar
Photo-Instagram

सोशल मीडियावर कलाकार त्यांच्या लाहनपणीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या या पोस्ट व्हायरल होत असतात, असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या मधे असलेल्या अभिनेत्याला  ओळखायचा प्रयत्न नेटकरी करत आहेत. या व्हिडीओ मध्ये सुरूवातीला एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो बघायला मिळतो आणि त्यानंतर त्या नटाचा फोटो समोर येतो.

या व्हायरल झालेल्या व्हिडीओत असलेला लहान मुलगा, ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘बाहुबली’ सारख्या  चित्रपटात काम करणारा लोकप्रिय कलाकार शरद केळकर आहे. शरदने हिंदी व मराठी चित्रपटां मधील त्याच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘लक्ष्मी बॉम्ब’ मध्ये अक्षय कुमार पेक्षा शरद केलकरच्या दमदार अभिनयाचे कौतुक होत आहे. तसंच आभिनेता प्रभासची प्रमुख भुमिक असलेला ‘बाहुबली’ या सुपरहिट चित्रपटात प्रभासचा हिंदी आवाज शरदने डब केला आहे. शरदने हा व्हिडीओ त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे आणि सुरूवातीला असलेला ब्लॅक अँड व्हाइट मध्ये असलेला लहान मुलाचा फोटो कोणीच ओळखु शकत नाही, मात्र नंतर झालेलं ट्रान्सफॉरमेशन पाहुन सगळे चकित होतात. शरदने ही पोस्ट शेअर करत हा व्हिडीओ त्याच्या फॅन्सने तयार केला असल्याचे सांगितले आहे. शरदने या पोस्टला कॅप्शन दिलं,” फॅनने तयार केलेला हा व्हिडीओ माला मंडे मोटिवेशन म्हणुन व्हाॅटस अॅप ग्रुपवर आला होता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar)

शरदचा हा व्हिडीओ आगी सारखा पसरत असून पोस्टवर लाखा पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. नेटकरी कमेंट करुन त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलं “सो स्वीट”, दुसरा युजर म्हणाला “मला तुमचा आवाज खुप आवडतो.” शरदने ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात देखील महत्वाची भूमिका साकारली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bollywood actor sharad kelkar black and white picture video went viral aad