scorecardresearch

क्रितीसोबतच्या ‘लाँग ड्राईव्ह’ विषयी सुशांत म्हणतो..

काही दिवसांपूर्वीच सुशांतने नवी कार खरेदी केली होती

क्रितीसोबतच्या ‘लाँग ड्राईव्ह’ विषयी सुशांत म्हणतो..
सुशांत सिंग राजपूत, क्रिती सनॉन

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री क्रिती सनॉन आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत ‘लाँग ड्राईव्ह’वर गेले होते. त्यांच्या या ‘लाँग ड्राईव्ह’मुळे बी- टाऊनध्ये या दोघांच्या रिलेशनशिपविषयी सुरु असणाऱ्या चर्चांना आणखीनच हवा मिळाली. सध्या सुशांत आणि क्रिती त्यांच्या आगामी ‘राबता’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी विविध ठिकाणी भेट देत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत असलेली ही जोडी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चांच्या वर्तुळात आली आहे.

हे दोन्ही कलाकारही त्यांच्या विषयी रंगणाऱ्या या सर्व चर्चांविषयी जाणून आहेत. इतकच काय तर, एका प्रसिद्ध वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये ‘लाँग ड्राईव्ह’ आणि क्रितीसोबतच्या नात्याविषयी प्रश्न विचारला असता सुशांत म्हणाला, ‘मी कार खरेदी करताचक्षणी क्रितीसोबत फिरायला (ड्राईव्हला) गेलो असं नाहीये. कार घेतल्याच्या दिवशी मी एकटाच त्यातून फिरलो, ड्राईव्हला गेलो. तेव्हा कोणी माझे फोटो काढले नाहीत.’

क्रिती आपली खूप चांगली मैत्रिण असल्याचे सांगत सुशांतने यावेळी त्याची भूमिका स्पष्ट केली. ‘आम्हा दोघांमधील ब्रेकअप- पॅचअपच्या काही चर्चा मी ऐकल्या होत्या. त्यानंतर लगेचच नव्या गाडीमुळे आमची नावं पुन्हा जोडण्यात आली. आम्ही फार चांगले मित्र आहोत. ती एक इंजिनियर आहे, मीसुद्धा त्याच वाटेचा वाटसरु होतो. आम्ही दोघंही मुळचे दिल्लीचे आहोत…’, असं सुशांत म्हणाला.

https://www.instagram.com/p/BTL_3IBATjQ/

दरम्यान, टेलिव्हिजन अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्या दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. अंकितासोबतच्या ब्रेकअपनंतर सुशांत ‘राबता’च्या चित्रीकरणात रुळला आणि तेव्हापासूनच या दोघांमधील जवळीक वाढत गेल्याचे म्हटले जात आहे.

पाहा : … या बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-04-2017 at 18:52 IST

संबंधित बातम्या