वरुण- नताशाचं नातं होणार ‘ऑफिशिअल’

ही तर नताशाचीच इच्छा…

Varun Dhawan, natasha
वरुण धवन, नताशा दलाल

अभिनेता वरुण धवन चित्रपटसृष्टीत आल्यापासूनच त्याच्याभोवती तरुणींचा घोळका पाहायला मिळाला. फार कमी वेळातच आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या डेव्हिड धवनच्या या मुलाचं फिमेल फॅन फॉलोइंगही दिवसेंदिवस वाढत आहे. पण, सध्या मात्र त्याच्या काही चाहत्यांची निराशा झालीये. कारण, वरुण सिंगल नसल्याचं सर्वांनाच ठाऊक झालं आहे. चित्रपटात ‘मै तेरा हिरो’ असं म्हणणारा वरुण खऱ्या आयुष्यातही कोणाचातरी ‘हिरो’ झाला आहे. मुख्य म्हणजे तिच्यासोबतचं नातं तो लवकरच सर्वांसमोर जाहीर करणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

वरुण गेल्या काही वर्षांपासून बालपणीची मैत्रीण नताशा दलाल हिला डेट करतोय. बऱ्याच कार्यक्रमांना आणि पार्ट्यांनाही त्याला तिच्यासोबत पाहिलं गेलंय. चित्रपटाचं स्क्रीनिंग असो किंवा कोणा सेलिब्रिटीच्या वाढदिवसाची पार्टी वरुण त्याच्या गर्लफ्रेंडसोबत आवर्जून या कार्यक्रमांना हजेरी लावतो. त्यामुळे अनेकांनाच त्यांच्या या सिक्रेट रिलेशनशिपचा सुगावा लागला आहे. तेव्हा आता वरुण खुद्द नताशासोबतची रिलेशनशिप सर्वांसमोर जाहीर करण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातंय. कारण त्याने आपल्या नात्याचा स्वीकार करावा अशी नताशाचीच इच्छा आहे. तेव्हा आता तो आपल्या नात्याचा स्वीकार कधी करतो याकडेच अनेकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

वाचा : …म्हणून ऋषी कपूर यांना मारण्यासाठी गेला होता संजय दत्त

नताशा आणि वरुणच्या कुटुंबियांमध्येही फार चांगले संबंध असून ती त्याच्या कौटुंबिक समारंभानाही हजेरी लावते. नताशासोबतचं वरुणचं नातं सर्वज्ञात असलं तरीही त्याने मात्र ही बाब नेहमीच गुलदस्त्यात ठेवली. त्यामुळे बी- टाऊनचा हा ‘स्टुडण्ट’ त्याच्या नात्यावरुन पडदा उचलणार का, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. काही दिवसांपूर्वीच #NoFilterNeha या ऑडिओ चॅट शोमध्ये गेलेल्या वरुणने त्याच्या आणि नताशासोबतच्या नात्याविषयी वक्तव्य केलं होतं. ‘मी कधीही रिलेशनशिपमध्ये असल्याचं नाकारलं नव्हतं’, असंही तो म्हणाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bollywood actor varun dhawan to make his relationship with natasha dalal official celebrity affair