Bollywood Actors Performed at Netra Mantena Sangeet : राजस्थानमधील उदयपूर शहर सध्या आकर्षक विद्युत रोषणाईने सजलं आहे. कारण अमेरिकेतील तेलुगू उद्योगपतीच्या लेकीचं लग्न या शहरात थाटामाटात पार पडणार आहे. या एक हाय-प्रोफाइल लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. कारण या लग्नात परफॉर्म करण्यासाठी फक्त बॉलीवूड नाही तर हॉलीवूड सेलिब्रिटीही पोहोचले आहेत.

अमेरिकेतील उद्योगपती रामा राजू मंटेना यांची मुलगी नेत्रा मंटेनाचं लग्न वामसी गदीराजूशी २३ नोव्हेंबरला उदयपूरमध्ये होणार आहे. नेत्रा व वामसी यांच्या लग्नाआधीचे कार्यक्रम सध्या सुरू आहेत. शुक्रवारी झालेल्या संगीत नाईटमध्ये रणवीर सिंह, जॅकलिन फर्नांडिस, वरुण धवनसह अनेक सेलिब्रिटी थिरकले.

शाहिद कपूर, जान्हवी कपूर यांच्याही डान्स परफॉर्मन्सचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रणवीर सिंहने तर पाहुण्यानाही थिरकायला भाग पाडलं. विरल भयानी या पापाराझी अकाउंटवरून काही व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत.

Award Banner

पाहा रणवीर सिंहचा व्हिडीओ

क्रिती सेनॉनच्या डान्सचा व्हिडीओ

शाहिद कपूरचा डान्स व्हिडीओ

जान्हवी कपूरचा डान्स व्हिडीओ

वरुण धवनचा डान्स व्हिडीओ

जॅकलिन फर्नांडिसचा डान्स व्हिडीओ

उद्योगपती रामा राजू मंटेना यांची मुलगी नेत्रा मंटेना ही वामसी गदिराजूशी लग्न करणार आहे. वामसी व नेत्रा यांच्या लग्नाचे इतर कार्यक्रम तीन दिवस चालणार आहेत. उदयपूरमधील अनेक आलिशान ठिकाणी हा विवाह सोहळा पार पडेल. यात द लीला पॅलेस, झेनाना महल आणि पिचोला तलावावरील आयलंड पॅलेस यांचा समावेश आहे.