अनुष्का शर्माने दिल्या मातृत्वाच्या टिप्स, म्हणाली….

अनुष्काने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती.

virat-anushka
Photo-Loksatta file images.

एका स्त्री साठी मातृत्व हे वरदान असते. नऊ महीने बाळाला पोटात सांभाळायाचे, त्याची  काळजी घ्यायची. जन्मानंतर त्याचे संगोपन करणे हे सगळे आईसाठी कष्टदायक असते पण त्यातच तिला आनंद असतो. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत जे सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहेत आणि त्यांना येणारे अनुभव सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता या यादीत अभिनेत्री अनुष्का शर्माचेही नाव सामील झाले आहे.

अनुष्काने ११ जानेवारी रोजी एका मुलीला जन्म दिला असून तिचे नाव वामिका आहे. अनुष्का सोशल मीडियावर सक्रिय असते. ती वेगवेगळे फोटो शेअर करत नेटकऱ्यांच्या संपर्कात असते. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने मातृत्वाच्या दरम्यान आलेला अनुभव सांगितला आहे. एक आई म्हणून पाहत असताना तिचे याबद्दलचे विचार खुलेपणे मांडले आहेत. “मुलीसाठी गुलाबी रंग आणि मुलासाठी निळा रंग या गोष्टीला मी मानत नाही कारण हे रंग आपणच दिले आहेत. मुला-मुलींनी सगळ्या रंगांची पसंती दिली पाहिजे. तसच मुलांच्या नर्सरीमध्ये देखील हे सर्व रंग असंण गरजेच आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

आईपणामुळे अनुष्काच्या आयुष्याला नव्याने सुरुवात झाली आहे. ती म्हणते, या नव्या पर्वात मी नवीन गोष्टी शिकत आहे. तुमच्यावर जबाबदारी येते आणि ती सांभाळण्यासाठी मी तयार आहे. तसंच यापुढे ज्या काही जबाबदाऱ्या मला सांभाळाव्या लागतील त्या सगळ्यासाठी मी तयार आहे. हळूहळू तुम्ही शिकत जाता. यासाठी तुम्हाला अधिक कष्ट घेण्याची गरज नाही.” असा सल्ला तिला देण्यात आला होता. ती पुढे सांगते, ” की मुलांचं संगोपन करणं, त्यांना काय हवं नको ते पाहणं ही काही साधी गोष्ट नव्हे. यासाठी तुम्हाला अनेक गोष्टी नव्याने शिकाव्या लागतात. आणि मुलांचा सांभाळ करावा लागतो.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bollywood actress anushka sharma shared her parenting experience and tips aad