scorecardresearch

न्यूड फोटो पोस्ट करुन ती काय सांगू इच्छिते? नेटिझन्सचा सेलिनाला सवाल

सोशल मीडियावर सेलिनाच्या ‘या’ फोटोची बरीच चर्चा आहे.

न्यूड फोटो पोस्ट करुन ती काय सांगू इच्छिते? नेटिझन्सचा सेलिनाला सवाल
सेलिना जेटली

‘प्रेगनेन्सी फोटोशूट’ हा ट्रेंड गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आला आहे. गरोदरपणात एखाद्या खास लोकेशनवर जाऊन फोटो काढण्याचा ट्रेंड हल्ली वाढताना दिसत आहे. अनेक सेलिब्रिटीही हा ट्रेंड फॉलो करताना दिसतात. आतापर्यंत अभिनेत्री लिसा हेडनपासून ते अगदी इशा देओलपर्यंत अनेकांनी त्यांचं प्रेगनेंन्सी फोटोशूट करुन घेतलं आहे. त्यामध्ये आता अभिनेत्री सेलिना जेटलीच्या नावाचाही समावेश झाला आहे. काही दिवसांपूर्वीच बेबीमूनसाठी गेलेल्या सेलिनाने सोशल मीडिया वर काही फोटो पोस्ट केले. पण, या फोटोमागोमागच्या एका पोस्टने अनेकांचं लक्ष वेधलं. किंबहुना तिच्या या फोटोवर अनेकांनी टीका केल्याचं पाहायला मिळालं.

इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये सेलिना एका बाथ टबमध्ये असून, तिचे बेबी बम्प स्पष्टपणे दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने त्यासोबत एक कॅप्शनही दिलं आहे. फोटो पोस्ट करण्यामागचं नेमकं कारण तिने या कॅप्शनमध्ये दिलंय. गरोदरपणात शरीरात होणाऱ्या बदलांविषयी ज्या काही नकारात्मक गोष्टी बोलल्या जातात, त्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तिने या कॅप्शनमध्ये मांडला आहे. ‘महिलांना स्वत:च्या शरीराची लाज वाटता कामा नये, उलट याविषयी त्यांना अभिमानच वाटायला हवा’, असा महत्त्वाचा संदेशही तिने या फोटोसोबत दिला आहे.

https://www.instagram.com/p/BYX5-nNgzKT/

https://www.instagram.com/p/BYTmo4vARn6/

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

सेलिनाने दिलेला संदेश फार कमी लोकांनीच समजून घेतला असून, अनेकांनीच तिच्या न्यूड फोटोवरच टीका केली आहे. ‘न्यूड फोटो पोस्ट करुन तिला नेमकं म्हणायचं तरी काय आहे’, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलाय. काहींना मात्र तिचा हा फोटो पोस्ट करण्यामागचा उद्देश उमगला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सेलिनाच्या या फोटोची बरीच चर्चा आहे.

https://www.instagram.com/p/BYQbQgLgQo1/

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bollywood actress celina jaitly shares naked picture with strong caption and gets slut shamed