दीपिका पादुकोन त्या फार कमी बॉलिवूड सेलिब्रेटींपैकी एक आहे ज्यांनी उघडपणे जेएनयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा विरोध केला आहे. रविवारी रात्री जेएनयू कॅम्पसमध्ये घुसखोरी करत काहीजणांनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मारहाण केली होती. यानंतर देशभरात आंदोलन सुुर असून मंगळवारी दीपिका जेएनयूबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी पोहोचली होती. यावेळी तिने जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेशी घोष हिची भेटदेखील घेतली.

आणखी वाचा – #JNURow: दीपिका एक शब्दही न बोलता निघून गेली, आयेषी घोष म्हणते….

man beats wife with baseball bat
पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून पतीचा पारा चढला; बेसबॉल बॅटनं केली मारहाण; गुन्हा दाखल
second wife of an invalid marriage may not complain of harassment but of dowry
अवैध लग्नाची दुसरी पत्नी छ्ळाची नाही, पण हुंड्याची तक्रार करू शकते
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”

आजतक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांवर भाष्य केलं. सध्याच्या परिस्थितीबाबत विचारलं असता तिने सांगितलं की, “जे मला बोलायचं होतं ते मी दोन वर्षांपुर्वी पद्मावत चित्रपट रिलीज होताना बोलले होते. आज जे काही चित्र आहे ते पाहून दु:ख होत आहे. याची सवय होऊ नये असंच वाटतं. कोणीही काहीही बोलणार आणि त्यातून निसटणार असं होऊ नये. मला भीती वाटत असून दु:खी आहे. हा आपल्या देशाचा पाया नाही”.

जेएनयूच्या हिंसाचारावर बोलताना दीपिकाने संताप व्यक्त केला. “जे काही सुरु आहे त्याचा प्रचंड राग आहे. पण त्यापेक्षाही जास्त वाईट गोष्ट म्हणजे कोणतीही कारवाई केली जात नाही आहे”.

आणखी वाचा – #boycottchhapaak: दीपिकाविरोधात नेटकरी आक्रमक, चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी

दीपिका आपला आगामी चित्रपट ‘छपाक’च्या प्रमोशनसाठी दिल्लीत आहे. हा चित्रपट मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केला असून अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या लक्ष्मी अग्रवालच्या आयुष्यावर आधारित आहे. दीपिकाने जेएनयूमधील आंदोलनात उपस्थिती लावताच ट्विटरवर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. काहीजणांनी तिच्या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करत #boycottchhapaak हॅशटॅग सुरु केला. तर काहीजणांनी #ISupportDeepika हॅशटॅग वापरत तिच्या भूमिकेला समर्थन दिलं.