वर्णभेदाला चित्रपटसृष्टीत स्थान नाही ही बाब आता स्पष्ट झाली असली तरीही फेअरनेस क्रिमच्या जाहिराती करण्याचं प्रस्थ मात्र सुरुच आहे. मुख्य म्हणजे बरीच प्रसिद्ध कलाकारमंडळी सर्रासपणे या जाहिरातींमध्ये झळकत आहेत. याविषयीच काही महिन्यांपूर्वी अभिनेता अभय देओलने आवाज उठवला होता. शाहरुख खान, दीपिका पदुकोण, सोनम कपूर, विद्या बालन आणि जॉन अब्राहम या आघाडीच्या कलाकारांवर त्याने शाब्दिक हल्ला चढवला होता. त्यावेळी या प्रकरणाला बरीच हवा देण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आता ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राने तिची भूमिका स्पष्ट केली आहे.

‘वोग’ या फॅशन मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत प्रियांकाने फेअरनेस क्रिमच्या मुदद्यावर तिचं मत मांडलं. मुख्य म्हणजे फेअरनेस क्रिमच्या जाहिरातीत काम केल्याचा आपल्याला पश्चाताप असल्याचंही तिने स्पष्ट केलं. ‘गव्हाळ वर्णाच्या बऱ्याच मुलींना, ‘अरेरे… तिचा वर्ण कसा आहे, बिचारी ती…’ अशा बऱ्याच गोष्टी ऐकाव्या लागतात. तुमची त्वचा एका आठवड्यातच उजळण्यासाठी बऱ्याच क्रिम्सची जाहिरात करण्यात येते. मीसुद्धा अगदी किशोरवयीन अवस्थेत अशा क्रिम्स वापरायचे. त्यानंतर अभिनय क्षेत्राच जेव्हा मी सक्रिय झाले, तेव्हा जवळपास २० वर्षांची असताना मी अशाच एका क्रिमची जाहिरात केली होती. त्यात मी स्वत:च्या वर्णाविषयी संकुचित असणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती.

Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
several injured in multiple stabbing-shooting incident
सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी; संशियाताला पोलिसांनी ठार केल्याचं वृत्त
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस

पण, जेव्हा ती जाहिरात मी पाहिली तेव्हा ‘अरे देवा! मी हे काय केलं…’ अशीच भावना माझ्या मनात घर करुन गेली. त्यानंतर मात्र मी माझ्या वर्णाविषयी, दिसण्याविषयी खुलेपणाने आणि मोठ्या अभिमानाने बोलू लागले. कारण मला माझा वर्ण खूप आवडतो”, असे प्रियांका म्हणाली.
नेहमीच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली ठाम मतं मांडणाऱ्या ‘देसी गर्ल’चं हे वक्तव्य अनेकांचे मन जिंकून गेले. काही दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेली प्रियांका पुन्हा एकदा तिच्या कामांमध्ये व्यग्र झाल्याचं पाहायला मिळतंय. सोशल मीडिया, चित्रपट वर्तुळ आणि आंतरराष्ट्रीय फॅशन जगतातही सध्या तिच्या नावाची चर्चा सुरु आहे. ही चर्चा होण्यामागचं कारण आहे तिचं नवं फोटोशूट. ‘वोग मॅग्झिन’च्या कव्हर गर्लच्या रुपात प्रियांकाच्या अदांनी पुन्हा सर्वांनाच घायाळ केलं.

वाचा : ‘चक दे! इंडिया’विषयी या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?