बिकिनी फोटो नंतर आता दिशाचा ‘हा’ व्हिडीओ झाला व्हायरल

अभिनेत्री दिशा पटानीने शेअर केलेल्या या व्हिडीओत तिचा बोल्ड अंदाज पुन्हा चाहत्यांच्या समोर आला आहे.

disha
Photo- Instagram / Disha Patani

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे दिशा पटानी. ती तिच्या लव्ह लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र सध्या  दिशाने केलेल्या काही पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिने शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इतर सेलिब्रिटींप्रमाणे दिशा तिच्या सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसते. मात्र जेव्हा ती पोस्ट करते तेव्हा सर्व नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते. नुकताच दिशाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ तिच्या मालदीवमधील सुट्टीच्या दरम्यानचा आहे. काही दिवसांपूर्वी दिश सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी मालदीवमध्ये गेली होती.  मात्र परतल्या नंतर ती आता या वेकॅशनला खूप मिस करत आहे. दिशाने शेअर केलेला हा थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani)

दिशाने शेअर केलेला या थ्रोबॅक व्हिडीओवर नेटकरी कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. या व्हिडीओत तिने शॉर्ट-स्कर्ट आणि टॉप परिधान केल्याचे दिसत आहे. या बरोबरच तिने सगळ्या नेटकऱ्यांना मालदीवच्या बीचची सफर घडवून आणली आहे.

याआधी देखील दिशाने तिच्या इन्स्टाग्रामवर बिकिनीमध्ये काही फोटो पोस्ट केले होते. तिच्या या बोल्ड अंदाजातील  फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  तिच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर,दिशा सलमान खानसोबत ‘राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ मध्ये महत्वाची भूमिका साकारली होती. लवकरच ती अर्जुन कपूर , तारा सुतारीया आणि जॉन अब्राहम यांची प्रमुख भूमिका असलेला ‘एक विलन २’ या चित्रपटात झळकणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bollywood actress disha patani shares bold video from her maldives vacation went viral aad

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!