अवघ्या काही काळातच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्री दिशा पटानीने तिचा चाहतावर्ग निर्माण करण्यात यश मिळवले आहे. ‘एम. एस. धोनी.- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ही अभिनेत्री आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपटातही काम करुन झाली आहे. जॅकी चॅन आणि सोनू सूद यांच्यासह ती ‘कुंग फू योगा’ या चित्रपटातूनही झळकली होती. सध्या दिशा पटानी बी टाऊनच्या काही आघाडीच्या अभिनेत्रींच्या शर्यतीत असून ही अभिनेत्री तिच्या क्षेत्रात व्यग्र असल्याचे पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एम. एस. धोनी.- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात फार थोड्या वेळासाठी झळकलेली दिशा अणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. ते कारण म्हणजे अभिनेता टायगर श्रॉफ सोबत असलेले तिचे नाते. टायगरसोबत दिशा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असल्याच्या चर्चांनाही काही दिवसांपूर्वी उधाण आले होते. चाहत्यांच्या मनावर निरागस सौंदर्याने भुरळ घालणारी ही अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवरही बऱ्यापैकी सक्रिय आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील दिशाच्या विविध पोस्टमुळे ती ‘इंटरनेट सेन्सेशन’ असल्याचेही म्हटले जात आहे. पण, दिशाप्रमाणेच तिची बहिणही सध्या सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधत आहे. प्रसारमध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या काही वृत्तांनुसार दिशाची मोठी बहिण खूशबू भारतीय लष्करामध्ये लेफ्टनंट आहे. सध्या दिशाच्या बहिणीचे म्हणजेच खूशबूचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

दिशा पटानी आणि खूशबू यांची व्यावसायिक क्षेत्र वेगळी असली तरीही त्यांचे काही फोटो या दोघींमध्ये असलेले प्रेमाचे नाते आणि त्यांच्या नात्यातील दृढता व्यक्त करत आहेत. दरम्यान, अभिनेत्री दिशा पटानीबद्दल सांगायचे झाले तर, काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर तिची नृत्यकौशल्ये दाखवणारा एक व्हिडिओ बराच चर्चेत आला होता.

पाहा: दिशा पटानीचा हा डान्स होतोय व्हायरल

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress disha patanis sister khushboo is also a stunner see pics
First published on: 06-03-2017 at 12:31 IST